KKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यात गतजेता मुंबईने 49 धावांनी कोलकातला धूळ चारली. मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 195 धावा करत कोलकाताला दिलेल्या 196 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात नाईट रायडर्सना 146 धावांपर्यंतच मजल मारता आली. चार वेळा मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात अष्टपैली कामगिरी केली आणि कोलकाताचा पराभव करत युएईच्या (UAE) धरतीवर पहिला विजय मिळवला. कोलकाताकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 33 धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) 33, नितीश राणा (Nitish Rana) 24, आंद्रे रसेल 11 धावा करून माघारी परतला. मुंबईने पहिल्या ओव्हरपासून कोलकातावर वर्चस्व कायम ठेवले होते. मुंबईकडून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिनसन, राहुल चहर यांनी प्रत्येकी 2, कीरोन पोलार्ड, यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. मुंबईचा बुमराहचा यंदा लयीत परतलेला दिसला. आजच्या सामन्यात बुमराहने सर्वोत्तम कामगिरी करत धावा देत विकेट घेतल्या. (KKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका'! कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या)

कोलकाताकडून शुभमन गिल आणि सुनील नारायण फलंदाजीसाठी आले आहेत. मुंबईने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करत कोलकाताला धावा करण्यापासून रोखले. ट्रेंट बोल्टने पहिली ओव्हर मेडन टाकली. त्यानंतर आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये शुभमन गिलला बाद करून 14 धावांवर बोल्टने केकेआरला पहिला धक्का दिला. गिलने 11 चेंडूत 7 धावा केल्या. पॅटिन्सनने त्यानंतर आक्रमक फलंदाज सुनील नारायणलाही 9 धावांवर बाद केले. कर्णधार दिनेश आणि धडाकेबाज फलंदाज नितीश राणा यांनी कोलकाताचा सावरला व सामन्यातील आव्हान जीवंत ठेवलं. पण नंतर लगेच कार्तिकला 30 धावा करून माघारी परतला. पोलार्डने राणाला देखील 24 धावांवर हार्दिक पांड्याकडे कॅच आऊट केले. विंडीजच्या आंद्रे रसेलकडून केकेआरला मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यानेही निराश केले. बुमराहने 11 धावांवर रसेलला आणि त्याच ओव्हरमध्ये इयन मॉर्गनला बाद केले. त्यानंतर, आयपीएलचा सर्वात महागडा पॅट कमिन्सने काही मोठे शॉट खेळले 33 धावा केल्या. बुमराहच्या ओव्हरमध्ये कमिन्सने 4 षटकार ठोकले.

आजच्या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र रोहित शर्माने आपल्या तुफान बॅटिंगने कोलकाताच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. मुंबईची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये क्विंटन डी कॉक 6 धावांवर बाद झाला. कर्णधार रोहितने 80 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 6 षटकार लगावले. सूर्यकुमार यादवनेही फटकेबाजी केली, पण त्याचे अर्धशतक हुलले.