मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाताचा आयपीएल (IPL) 2020 मधील हा पहिला सामना आहे, तर मुंबईचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला त्यामुळे आज ते विजयाच्या शोधात आजच्या सामन्यात मैदानावर उतरले आहेत. इतकंच नाही तर आजच्या सामन्यात विजय मिळवून ते टीमचा अनुभवी अष्टपैलू कीरोन पोलार्डसाठी (Kieron Pollard) आजचा सामना विशेष बनवू पाहिलं. याचे कारण म्हणजे आजचा सामना हा विंडीजच्या पोलार्डचा मुंबई इंडियन्सकडून 150 वा टी-20 सामना आहे आणि फ्रँचायझीकडून दीडशे खेळणारा पहिला खेळाडू बनला आहे. शिवाय, कोलकाताविरुद्ध सामन्यापूर्वी मुंबईने देखील त्याला एक खास भेट दिली. (KKR vs MI, IPL 2020: दिनेश कार्तिकने जिंकला टॉस, कोलकाता नाइट रायडर्स करणार पहिले गोलंदाजी)
अबू धाबी येथे कोलकाताविरुद्ध सामन्यापूर्वी पोलार्डला 150 नंबर लिहिलेली जर्सी देण्यात आली. मुंबईसाठी आजवर अनेक खेळाडू खेळले. त्यात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सनथ जयसूर्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. पण पोलार्ड मुंबई फ्रँचायझीकडून 150 सामने खेळणारा पहिला फलंदाज बनला आहे. 33 वर्षीय पोलार्डने 2010 मध्ये एमआयमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्याने लीगमधील सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून स्वत:ला स्थापित केले. दरम्यान, एका फ्रँचायझीकडून सर्वाधिक सामने खेळणारा पोलार्ड आयपीएलचा चौथा खेळाडू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने 178, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज जोडी - सुरेश रैना (164) आणि एमएस धोनी (162) यांनी सर्वाधिक सामने खेळले आहेत. पोलार्ड या यादीत चौथा आहे, तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा 145 सामन्यासह पाचव्या स्थानावर आहे.
He's not just a player. He's an emotion 💙
Let's go, #Polly150 😎💪#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #KKRvMI @KieronPollard55 pic.twitter.com/R1qPOznVdj
— Mumbai Indians (@mipaltan) September 23, 2020
पोलार्डने 149.64 च्या स्ट्राइक-रेटने 149 आयपीएल सामन्यात 2,773 धावा आणि 14 अर्धशतके ठोकली आहेत. शिवाय त्याने 56 विकेट्स देखील घेतल्या आहेत. एकूणच, तो टूर्नामेंटच्या इतिहासात हा पराक्रम करणारा 14 वा खेळाडू आहे. सुरेश रैनाने स्पर्धेत सर्वाधिक 193 सामने खेळले आहेत. रोहितने देखील एक मोठा टप्पा गाठला कारण तो आपला 190 वा आयपीएल सामना खेळत आहे. त्याने यापूर्वी डेक्कन चार्जर्सकडून 45 सामने खेळले आहेत.