मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: File Photo)

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आयपीएलचा (IPL) सामना थोड्याच वेळात अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियम येथे थोड्याच वेळात सुरु होणार आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या 13व्या हंगामातील कोलकाताचा पहिला तर मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना आहे. आजच्या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मुंबईचा संघ पेपरवर मजबूत दिसत असला तरी कोलकाताने युएई (UAE) येथे खेळत मुंबईविरुद्ध बाजी मारली आहे. युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आजवरच्या सामन्यात मुंबईला एकदाही विजय मिळवता आला नाही, पण आज मात्र ते पराभवाचा हा क्रम मोडू पाहत असतील. कोलकाताच्या रूपात मुंबईसमोर कडवे आव्हान असेल. (KKR vs MI, IPL 2020: दुबईमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे भव्य स्वागत, बुर्ज खलिफावर झळकले खेळाडूंचे फोटो, पाहा या आकर्षक रोषणाईची झलक Watch Video)

मुंबईकडून आजच्या सामन्यात सौरभ तिवारी ऐवजी ईशान किशनला जागा मिळाली आहे. मुंबईकडून मागील सामन्यात मधल्याफळीने निराशाजनक कामगिरी केली होती आणि आजचा सामना जिंकण्यासाठी त्यांना अष्टपैलू कामगिरी करणे आवश्यक आहे. कीरोन पोलार्डसाठी आजचा सामना खास असणार आहे कारण हा त्याचा स्पर्धेतील 150 वा सामना आहे. दुसरीकडे, कोलकाता संघाचा प्लेइंग इलेव्हन खूप संतुलित दिसत आहे. कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स असे चार विदेशी खेळाडू आहेत. वेस्ट इंडिजचा सुनील नारायण आणि भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल कोलकाताच्या डावाची सुरुवात करतील. कोलकाताकडून सुनील नारायण आणि कुलदीप यादवबरोबर सगळ्यात महागडा खेळाडू पॅट कमिन्सवर केकेआरच्या गोलंदाजीची मदार असेल.

पाहा कोलकाता आणि मुंबईचा प्लेइंग इलेव्हन:

कोलकाता नाईट रायडर्स: सुनील नारायण, शुभमन गिल, नितीश राणा, इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (कॅप्टन/ विकेटकीपर), पॅट कमिन्स, निखिल नाईक, कुलदीप यादव, शिवम मावी आणि संदीप वारियर.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कीरोन पोलार्ड, जेम्स पॅटिनसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.