KKR vs MI, IPL 2020: अरे रे रे! हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)
हार्दिक पांड्या झाला 'हिट विकेट' (Photo Credit: PTI)

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आपल्या वादळी खेळासाठी ओळखला जातो आणि फलंदाजी करताना तो उभा राहतो आणि वेगळा खेळ करतो. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) केकेआरविरुद्ध (KKR) सामन्यात हार्दिकही असाच काहीसा खेळत होता. यादरम्यान हार्दिक आंद्रे रसेलचा (Andre Russell) बॉल खेळल्याशिवाय आऊट झाला ते पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल, केकेआरविरुद्ध हार्दिक विचित्र पद्धतीने बाद झाला की आता सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे. सामन्यात 19व्या ओव्हरमध्ये रसेलच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिक 'हिट विकेट' (Hardik Pandya Hit-wicket) आऊट झाला. रसलने हार्दिकला ऑफ साईडला टाकलेला चेंडू त्याला मारावासा वाटला पण त्याने चेंडू सोडून दिला, पण हार्दिकची स्टंपला लागल्याने त्याला माघारी परतावे लागले. त्याने 13 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकारासह 18 धावा केल्या. (KKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय)

हार्दिक आऊट झाल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले पण नंतर तो 'हिट विकेट आऊट झाल्याचे समोर आले. रसेलचा चेंडू जेव्हा हार्दिककडून विकेटकीपर दिनेश कार्तिककडे गेला तेव्हा मुंबईचा ऑल-राउंडर हिट विकेट झाल्याचे कळले. दरम्यान, आजच्या सामन्यात हार्दिक खूप चांगल्या लयीत दिसला होता. केकेआरचा मुख्य गोलंदाज पॅट कमिन्सच्या चेंडूवर त्याने काही मोठे शॉट्स देखील खेळले. रोहित शर्माच्या बाद झाल्यानंतर हार्दिकवर मोठी जबाबदारी होती पण उभे राहण्याच्या शैलीमुळे तो माघारी परतला. पाहा हार्दिकची ही विकेट:

हार्दिकच्या अशा बाद होण्याच्या पद्धतीने सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. पाहा सोशल मीडियावर यूजर्सच्या मजेदार प्रतिक्रिया:

हार्दिक पांड्या...

पोट धरून हसाल

हार्दिक तू ग्रेट आहेस...

पहिल्यांदा नाही...

गलती से मिस्टेक

दरम्यान, आयपीएलच्या इतिहासातील हा 11 वा प्रसंग होता जेव्हा फलंदाज हिट विकेट बाद झाला. युवराज सिंह, मिसबाह-उल-हक, रवींद्र जडेजा आणि डेविड वॉर्नर देखील या लाजीरवाण्या यादीत आहेत. दुसरीकडे, आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिले फलंदाजी करून 195 धावा केल्या प्रत्युत्तरात केकेआरला 146 धावांपर्यंतच मजल मारता आली.