टी-20 क्रिकेट मोठे-मोठे फटकेबाजीसाठी ओळखले जाते. बर्याच क्रिकेटपटूंचे लहानपणीचे किस्से ऐकायला मिळते की त्यांनी असे शॉट मारून शेजार्यांच्या खिडक्यांच्या काचा तोडल्या. असाच एक शॉट आयर्लंडचा स्टार क्रिकेटर केविन ओ'ब्रायन (Kevin O’Brien) याने गुरुवारी एका सामन्यात लगावला ज्याने दुसऱ्या कोणाची नाही तर स्वत:च्याच गाडीची काच फुटली. स्थानिक टी-20 सामन्यात खेळत असताना ओब्रायनने 37 चेंडूत 82 धावा ठोकल्या. ओ'ब्रायनने या खेळत 8 षटकार ठोकले. मात्र दुर्दैवाने या घातक फलंदाजीचा फटका खुद्द ओ'ब्रायनलाच बसला. ओ'ब्रायनने मारलेला एक षटकार पेमब्रोक क्रिकेट क्लबबाहेर (Pembroke Cricket Club) जाऊन त्याच्या गाडीच्या मागील काचेवर आदळला. क्रिकेट आयर्लंडने ओ'ब्रायनच्या गाडीचा फोटो ट्विटरवरून शेअर याबद्दल माहिती दिली. दरम्यान, ओ'ब्रायनने मारलेला षटकार इतका जबरदस्त होता की चेंडू झाडांमधून वाट काढत थेट त्याच्या गाडीवर आदळला. (IPL 2020 Update: CSK ट्रेनिंग कॅम्पमध्ये एमएस धोनीने ठोकले मोठे षटकार, पाहून सुरेश रैनाने मारली शिटी Watch Video)
सामन्यानंतर, 36 वर्षीय अष्टपैलूने गाडीची काच बदलण्यासाठी थेट गॅरेजकडे धाव घेतली. डीलरशिपने ट्विटरवर गाडीचा फोटो शेअर करून म्हटले की “केविन ओ'ब्रायन काळजी करू नका आम्ही हे नवीनइतकेच चांगले तयार करू.” ओ'ब्रायनने नंतर यावर एक भन्नाट प्रतिक्रिया दिली आणि पुढच्या वेळी यापुढे गाडी पुढे पार्क करू असे वचन दिले. याआधी देखील ओ'ब्रायनने शानदार षटकार ठोकला होता ज्याने मैदानाबाहेर उभ्या असलेल्या त्याच्याच गाडीची काच फोडली.
📸: KEVIN O’BRIEN SMASHES SIX...
...and his own car window. Seriously.#IP2020 | @TestTriangle ☘️🏏 pic.twitter.com/dKbfDRHrjY
— Cricket Ireland (@Irelandcricket) August 27, 2020
ओ'ब्रायनची प्रतिक्रिया
Didn’t need the air-con on the drive up to you lads. 🤣 unreal service once again. Never fails to disappoint. I’ll park further away next time 😝 #BestInTheBusiness https://t.co/tNKTG0tRLA
— Kevin O'Brien (@KevinOBrien113) August 27, 2020
ओ'ब्रायनने इंटर-प्रोविंशल टी-20 ट्रॉफी स्पर्धेतील लीन्स्टर लाइटनिंगसाठी 37 चेंडूत 82 धावा केल्या. त्याच्या या डावाच्या जोरावर, पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात लाइटनिंगने उत्तर पश्चिम वॉरियर्सविरुद्ध 12 ओव्हरमध्ये 4 गडी गमावून 124 धावा केल्या. ओ'ब्रायनने आपल्या खेळीत 3 चौकार आणि जबरदस्त 8 षटकार लगावले. या दरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट 221 पेक्षा जास्त होता. यानंतर नॉर्थ वेस्ट वॉरियर्स संघाला 12 षटकांत 8 बाद 104 धावा करता आल्या आणि लॅन्स्टरने डकवर्थ लुईस नियमाने 24 धावांनी सामना जिंकला. संघासाठी विल्यम पोर्टरफिल्डने 30 चेंडूत चार षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 50 धावा केल्या.