Photo Credit- X

KCA Suspends S Sreesanth: केरळ क्रिकेट असोसिएशनने माजी भारतीय क्रिकेटपटू एस श्रीशांतला तीन वर्षांसाठी निलंबित केले (KCA Suspends S Sreesanth) आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघातून संजू सॅमसनला वगळल्याबद्दल त्याने बोर्डावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर केसीएने एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले की, बोर्डाच्या विशेष सर्वसाधारण सभेदरम्यान एस श्रीशांतच्या निलंबणाचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय, त्याच्यावर कायदेशीर कारवाई ही करण्यात येणार आहे.

केरळ प्रीमियर लीगमधील फ्रँचायझी संघ कोल्लम एरीजचा सह-मालक श्रीशांतसह, फ्रँचायझी संघ कोल्लम एरीज, अलाप्पुझा टीम लीड आणि अलाप्पुझा रिपल्स यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, फ्रँचायझींनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यामुळे, त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. "वादग्रस्त वक्तव्यानंतर, केसीएने श्रीशांत आणि फ्रँचायझी संघ कोल्लम एरीज, अ‍ॅलेप्पी टीम लीड कंटेंट क्रिएटर साई कृष्णन आणि अ‍ॅलेप्पी रिपल्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. फ्रँचायझी संघांनी नोटीसला समाधानकारक उत्तरे दिल्याने, बैठकीत त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, केसीएने संघ व्यवस्थापनाला सदस्यांचा समावेश करताना सतर्क राहण्याचे निर्देश दिले," असे केसीएच्या निवेदनात म्हटले आहे.

केसीएने असेही म्हटले आहे की 'ते संजू सॅमसनचे वडील, सॅमसन विश्वनाथ, रेजी लुकोसे आणि ट्वेंटीफोर न्यूज चॅनेलच्या अँकरकडून बोर्डाबद्दल निराधार टिप्पणी केल्याबद्दल भरपाईसाठी कायदेशीर कारवाई करेल.' केसीएने केरळच्या विजय हजारे ट्रॉफी संघातून सॅमसनला वगळल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देखील दुर्लक्षित करण्यात आले. ज्यामुळे श्रीशांत प्रभावित झाला नाही. या निर्णयाबद्दल त्याने बोर्डाची निंदा केली. श्रीशांतच्या वक्तव्यानंतर, केसीएने वेगवान गोलंदाजाला कारणे दाखवा नोटीस बजावली.

बोर्डाने त्यांच्या उत्तरात श्रीशांतवर टीका केली आणि मॅच फिक्सिंगच्या घटनेचाही पुन्हा उल्लेख केला. “जेव्हा श्रीशांत मॅच फिक्सिंग प्रकरणातील आरोपांना तोंड देत तुरुंगात होता, तेव्हा केसीएच्या अधिकाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला होता. त्याला भेटत होते. आता न्यायालयाने फौजदारी खटला रद्द केला असला तरी, मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याला निर्दोष सोडण्यात आलेले नाही हे खरे आहे. अशा परिस्थितीत, श्रीशांतला इतर खेळाडूंसाठी पुढे येण्याची गरज नाही,” असे निवेदनात म्हटले आहे.