IPL मध्ये Taimur ला काही संधी आहे का? विचारत फोटो पोस्ट करणार्‍या Kareena Kapoor ला  Delhi Capitals चा रिप्लाय; इथे पहा दिल्ली संघाची ऑफर
Taimur and Team Delhi Capitals | Photo Credits: Instagram

यंदा आयपीएलचा 13 (IPL 13)  वा हंगाम सुरू आहे. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आयपीएलचे सामने युएई मध्ये खेळवले जात आहेत. पण क्रिकेट हा धर्माप्रमाणे समजल्या जाणार्‍या भारतीय क्रिकेट चाहत्यांना टेलिव्हिजन वरूनच त्याचा आनंद घेत दुधाची तहान ताकावर भाग भागवावी लागत आहे. घरात क्रिकेटचा वारसा असलेल्या स्टारकिड तैमुर अली खानचा (Taimur) देखील मैदानावरील हातात बॅट घेतलेला फोटो काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) पोस्ट केला होता. त्यावर करिनाने तैमुरसाठी IPL मध्ये काही जागा आहे का? असा सवाल विचारत मजेशीर कॅप्शनसह त्याचा फोटो पोस्ट केला होता. तैमुरच्या अन्य फोटोंप्रमाणे हा देखील व्हायरल झाला. बघता बघता चक्क तैमुरला दिल्ली कॅपिटल संघाकडून 'ऑफर' देखील मिळाली आहे. तैमुरच्या फोटोवर दिल्ली कॅपिटल संघाकडून (Delhi Capitals) प्रतिसाद मिळाला आहे. करिनाच्या पोस्टमध्ये कमेंट करताना दिल्ली कॅपिटलने लाजवाब रिप्लाय आहे. 'त्याला आमच्या सोबत जल्लोष करताना पहायला आवडेल. खरा नवाब राजधानीला शोभतो' अशा आशयाचा रिप्लाय लिहत दिल्लीच्या संघाने तैमुरचं स्वागत करायला आवडेल असं म्हटलं आहे. सैफ अली खानच्या पावलावर पाऊल टाकत 'तैमुर' चं ही वॉल पेंटिंग; पहा करिनाच्या Inhouse Picasso ची कलाकृती!

करिना कपूर खान पोस्ट

 

View this post on Instagram

 

Any place in the IPL? I can play too 💯💯👍🏻❤️❤️

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

करिनाने काही दिवसांपूर्वी तैमुरचा फोटो पोस्ट करत, 'आयपीएल मध्ये काही जागा आहे का? मी सुद्धा खेळू शकतो.' असं म्हटलं आहे.

दरम्यान तैमुर अली खान मोठेपणी कोणतं क्षेत्र निवडेल याला अजून अवकाश आहे पण सैफ अली खानला तो अभिनेता झालेलं बघायला आवडेल असं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते. सैफचे वडील टायगर पतौडी हे भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू होते. त्यामुळे घरात अभिनय आणि क्रिकेटचा वारसा असताना तैमुर काय निवडतो हे पहाणं देखील उत्सुकतेचं ठरेल.

आयपीएल 13 मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ मस्त खेळतोय. सध्या हा संघ 7 पैकी 5 सामने जिंकत पॉईंट टेबल्स मध्ये अव्वल स्थानी आहे. भारतामध्ये 2012 साली आयपीएल सामन्यांना सुरूवात झाली. टी 20 फॉरमॅट मध्ये खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेमध्ये जगभरातील क्रिकेटर्स विविध संघामध्ये विभागून एकमेकांविरूद्ध खेळतात.