सैफ अली खानच्या पावलावर पाऊल टाकत 'तैमुर' चं ही वॉल पेंटिंग; पहा करिनाच्या Inhouse Picasso ची कलाकृती!
काही दिवसांपूर्वी सैफ अली खानने देखील करिनासाठी खास चित्ररूपी फुलांची भेट दिली होती. आता त्याच भिंतीच्या बाजूला तैमुर देखील आपली कलाकृती साकारत असल्याचा नवा फोटो आता करिनाने शेअर केला आहे.
कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे सध्या निम्मं जग घरामध्ये अडकून पडलं आहे. अशामध्ये घरातच मुलांना 24 तासं रमवणं हे अनेक पालकांसाठी आव्हान आहे. मात्र अभिनेत्री करिना कपूर खानने तिचा लेक तैमुर या क्वारंटीन काळात काय करतोय याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दरम्यान #QuaranTim सोबत तैमुर चक्क घरातल्या भिंतींवर चित्र साकारत असल्याचा एक सुपर क्युट फोटो करिनाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी सैफ अली खानने देखील करिनासाठी खास चित्ररूपी फुलांची भेट दिली होती. आता त्याच भिंतीच्या बाजूला तैमुर देखील आपली कलाकृती साकारत असल्याचा नवा फोटो आता करिनाने शेअर केला आहे.
तैमुरचा सोशल मीडीयामध्ये खास क्रेझ आहे. त्यामुळे त्याची एक छबी टिपण्यासाठी 'paparazzi'मध्ये झुंबड उडते. मात्र आता लॉकडाऊनमुळे क्वारंटीन झालेल्या तैमुरची झलक करिनाच्या इंस्टाग्राम अकाऊंटमुळे पूर्ण झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच करिना कपुर खानने आपलं अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट सुरू केलं आहे. आता लॉकडाऊनमुळे घरात असलेली करिना इंस्टाग्रामच्या माध्यमातून क्वारंटीन मध्ये सैफिना आणि तैमुर काय करत आहेत याचे काही फोटो शेअर करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात करण जोहरच्या 'या' कृत्यावर त्याची मुले यश आणि रूही ने नोंदवला आक्षेप, पाहा पोट धरुन हसायला लावणारा हा व्हायरल व्हिडिओ.
सैफचं करिना साठी खास गिफ्ट
View this post on Instagram
तैमुरचं वॉल पेंटिंग
View this post on Instagram
लाल शॉर्ट्समध्ये वॉल पेंटींग करत असलेल्या तैमुरच्या फोटो खाली करिनाने सुंदर कॅप्शन लिहलं आहे. 'जर तुमच्या क्रिएटीव्हिटीला एखादी भिंत अडवत असेल तर ति देखील रंगवा'.
काही दिवसांपूर्वी सैफ अली खानच्या टेलिव्हिजनमधील लाईव्ह शो मध्येही तैमुरने' हल्क मास्क' घालून खास अंदाजात एंट्री घेतली होती.
(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2020 09:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

