कपिल देव, रॉबिन सिंह (Photo:ANI)

क्रिकेट विश्वचषकनंतर भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या कोच पदासाठी नव्याने अर्ज मागवले होते. यासाठी हजारो इच्छूकांनी अर्ज केले. आणि माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखालील समितीने सहा नावांची निवड केली. रवी शास्त्री (Ravi Shastri), ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूड, लालचंद राजपूतन्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हेसन आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि फिल्डिंग कोच रॉबिन सिंह (Robin Singh) यांची निवड करण्यात आली होते. भारताच्या पुढील प्रशिक्षकाच्या निवडीसाठी कपिल देव आणि त्यांची समिती आज या उमेदवारांची मुलाखत घेणार आहे. आणि त्यासाठी देवसह रॉबिन सिंह बीसीसीआय मुख्यालयात पोहचले आहेत. आणि बीसीसीआय आज संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषदेत भारतीय संघाच्या नव्या स्टाफचे आणि प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा करेल. (टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी रवी शास्त्री सज्ज, भारतीय संघाचा 'हा' माजी सलामीवीर होऊ शकतो बॅटिंग कोच)

दरम्यान, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अनेक मर्यादा घातल्या होत्या. त्यात कमाल वयाची मर्यादा 60 वर्ष ठेवली आहे होती. सध्याच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्याचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनाच प्रबळ दावेदार मानले जात आहे. 2017 नंतर पुन्हा एकदा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची कामगिरी चांगलीच उंचावली. यादरम्यान भारताने गेल्या वर्षी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा टेस्ट मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

कपिल देव

रॉबिन सिंह

शास्त्री हे सध्या संघासह वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. आणि त्यामुळे त्यांना मुंबईला येऊन मुलाखत देण्यास जमणार नाही. शास्त्री हे स्काइपच्या माध्यमातून देव यांच्या समितीसह मुलाखत होईल असे म्हटले जात आहे. कोहलीला मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्रीच हवे असल्याचे त्याने उघडपणे जाहीरही केले होते. कोहली म्हणाला,''रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास मला आणि संघाला आनंद होईल."