
Jos Buttler: काही संघांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) मध्ये उत्तम कामगिरी केली. ज्यात भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण जोस बटलर (Jos Buttler) च्या नेतृत्वाखाली हॉट फेव्हरिट म्हणून प्रवेश केलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. एकही सामना न जिंकता त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
इंग्लंडच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर, संघाचा कर्णधार जोस बटलरने एकदिवसीय कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत तो स्वतः पुढे आला आणि कर्णधारपदाचा राजीनामा दिला. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर बटलरने अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.
कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबद्दल भावनिक
View this post on Instagram
इंग्लंडच्या व्हाईट बॉल फॉरमॅट म्हणजेच एकदिवसीय आणि टी-20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर जोस बटलर खूप भावनिक झाला. त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एका पोस्टद्वारे या भावना व्यक्त केल्या. ज्यामध्ये त्याने ईसीबी, इंग्लंड संघातील खेळाडू, चाहते तसेच त्याच्या कुटुंबाचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.
इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जोस बटलरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने पत्नी आणि दोन्ही मुलांसोबतचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की,'इंग्लंडच्या व्हाईट-बॉल संघाच्या कर्णधारपदावरून मी पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचे मला खूप दुःख होत आहे. इंग्लंडचे कर्णधारपद भूषवणे हा एक मोठा सन्मान आहे आणि असे काहीतरी केल्याचा मला नेहमीच अभिमान वाटेल. निकाल स्पष्ट आहेत आणि माझ्यासाठी आणि संघासाठी हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. कर्णधार म्हणून मला पाठिंबा देणाऱ्या सर्व खेळाडू आणि इंग्लंड चाहत्यांचे मी या संधीचा फायदा घेत आभार मानू इच्छितो. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी माझी पत्नी लुईस आणि माझ्या कुटुंबाचे आभार मानू इच्छितो. माझ्या नोकरीतील चढ-उतारांमध्ये तुम्ही माझ्यासाठी अढळ आधारस्तंभ आहात. आणि मी तुमचे आभार मानू शकतो तेवढे कमी आहे.'