Jammu and Kashmir: जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) माहोरजवळ (Mahore Accident) मंगळवारी एका मिनी बसचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आणि दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या वैद्यकीय सुविधांमध्ये हलवण्यात आले आहे. आपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांनी बचाव पथकांसह तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले. वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) रियासी, परमवीर सिंह यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, गंभीर जखमी झालेल्या चार जणांना उपचारांसाठी जम्मूच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) पाठवण्यात आले आहे. (Rajkot Shocker: धक्कादायक! 76 वर्षीय वडिलांना करायचे होते दुसरे लग्न; विरोध केल्यास 52 वर्षीय मुलाची गोळ्या घालून केली हत्या)

जम्मू-काश्मीर रस्ता अपघात

अधिकाऱ्यांनी सांगितले की, माहोरमधील गंगोट येथे जम्मूहून सांगलीकोटला जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हलरचा अपघात झाला. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय सुविधांमध्ये हलवण्यात आले. स्थानिक प्रशासनाने, बचाव पथकांसह, तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.