इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील अॅशेस (Ashes) मालिकेतील पहिली टेस्ट रंगतदार ठरली. एक वेळी कमकुवत दिसत असलेला ऑस्ट्रेलिया संघाने प्रभावी खेळी करत पहिला टेस्ट सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith). स्मिथने सामन्याच्या दोन्ही डावात तुफानी शतके झळकावली आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑन (Nathan Lyon) याने सहा विकेट्स इंग्लंडला मुश्किलीत पाडले आणि अखेरीस ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी पहिली टेस्ट जिंकली. पहिली टेस्ट मॅच जिंकत ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून घेतली आहे. दोन्ही संघातील दुसरी टेस्ट 14 ऑगस्टपासून लॉर्ड्सवर (Lords) सुरू होणार आहे. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया आपला प्रभाव बनवून ठेवण्याच्या प्रयत्नात असेल तेर इंग्लंड पुनरागमनाच्या प्रयत्न असेल. (Ashes 2019: ऑस्ट्रेलिया- इंग्लंड पहिल्या सामन्यात कांगारूंचा जोरदार विजय, 251 धावांनी इंग्लंडचा पराभव)
दरम्यान, दुसऱ्या सामन्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) अजून दुखापतीतून सावरला नाही. आणि त्यामुळे त्याने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. अँडरसन पहिल्या टेस्टच्या पहिल्या डावात केवळ चार ओव्हर टाकून मैदनाबाहेर गेला होता. त्याला पोटरीला दुखापत झाली होती आणि MRI च्या अहवालात ही दुखापत बरी झाली नसल्याचे उघड झाले.
An injury update on @jimmy9#Ashes
— England Cricket (@englandcricket) August 6, 2019
शिवाय हे देखील स्पष्ट नाही की त्याला फिट व्हायला किती काळ लागेल. त्यामुळे त्याला संपूर्ण मालिकेला मुकावे लागेल अशी चर्चा सध्या सुरु आहे. पहिल्या सामन्यात दुखापत झाल्यावर अँडरसन बॉलिंग करायला पुन्हा मैदानावर उतरला नाही. आणि सामन्याच्या अखेरीस 11 व्या क्रमांकावर फलंदाजी करायाला आला. दुखापतीमुळे अँडरसन आयर्लंड विरुद्ध एकमेव टेस्ट मालिकेत देखील खेळू शकला नव्हता.