Ishan Kishan (Photo Credit - X)

SRH vs RR, IPL 2025 2nd T20: आज आयपीएल 2025 चा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान परागच्या हाती आहे. तर, हैदराबादसाठी पॅट कमिन्स ही भूमिका बजावतोय. गेल्या हंगामात हैदराबाद अंतिम फेरीत पोहोचला होता. पण त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला. यावेळीही हैदराबादचा संघ खूप मजबूत आहे. दुसरीकडे, राजस्थानला कमी लेखणेही चुकीचे ठरेल. दरम्यान राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने राजस्थानसमोर 287 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

 इशान किशनने झळकावले शानदार शतक

सनरायझर्स हैदराबादने इतिहास रचला आहे. त्याने आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली आहे. संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 286 धावा केल्या आहेत. हैदराबादकडून इशान किशनने नाबाद शतक झळकावले आहे. त्याने 47 चेंडूत 106 धावा केल्या आहेत. इशानने 11 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूत 67 धावा केल्या. त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. नितीश रेड्डी यांनी 30 आणि क्लासेन यांनी 34 धावा केल्या.

तुषार देशपांडेने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट्स

दुसरीकडे, स्टार गोलंदाज महेश थीकशनाने राजस्थान रॉयल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. राजस्थान रॉयल्सकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे व्यतिरिक्त महेश थीकशनाने दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकांत 287 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.