South Africa National Cricket Team vs Ireland National Cricket Team 3rd ODI 2024 Highlights: दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (Ireland vs South Africa) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 7 ऑक्टोबर रोजी अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 69 धावांनी पराभव करत मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने 92 चेंडूत 88 धावांची दमदार कामगिरी केली. त्याने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय ग्रॅहम ह्यूम आणि विल यंग यांनी 3-3 बळी घेतले. दुसरीकडे तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी फ्लॉप झाली. मात्र, मालिका 2-1 अशी खिशात घालण्यात आफ्रिकन संघाला यश आले. (हेही वाचा:Australia Women vs New Zealand Women T20 Head To Head Record: ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड? आजच्या सामन्यात कोणाचे असेल वर्चस्व; येथे पहा हेड टू हेड आकडेवारी )
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 9 गडी गमावून 289 धावा केल्या. आयर्लंडकडून कर्णधार पॉल स्टर्लिंगने 92 चेंडूत सर्वाधिक 88 धावा केल्या. याशिवाय अँड्र्यू बालबर्नीने 73 चेंडूत 45 धावा आणि हॅरी टेक्टरने 48 चेंडूत 60 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून लिझाद विल्यम्सने 10 षटकांत 56 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. ओटेनिल बार्टमन आणि अँडिले फेहलुकवायो यांनी 2-2 विकेट घेतल्या.
290 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 46.1 षटकात 215 धावांत सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून जेसन स्मिथने 93 चेंडूत 91 धावा केल्या. याशिवाय काईल वॉरनने 38 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी खराब झाली. तर आयर्लंडकडून ग्रॅहम ह्यूम आणि विल यंग यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. मार्क एडेअरने 2, फिओन हॅन्डला 1 आणि मॅथ्यू हम्फ्रीजला 1 विकेट मिळाली.