पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमने (Wasim Akram) नुकतीच इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ला जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्पर्धा म्हणून रेटिंग दिले. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सबरोबर प्रशिक्षक म्हणून काम केलेल्या अक्रमने पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) तुलनेत आयपीएल (IPL) उत्तम का आहे हे सांगितले. 2008 मध्ये आयपीएलचा उद्घाटन हंगाम खेळला गेला आणि त्यानंतर या स्पर्धेला वर्षानुवर्षे जगभरातील काही सर्वोत्कृष्ट खेळाडूंचे वैशिष्ट्य लाभले आहे. आयपीएल आणि पीएसएलमधील (PSL) सर्वात मोठा फरक दर्शवताना अक्रमने आवर्जून सांगितले की भारतीय लीगमध्ये गुंतवणूकीची रक्कम पीएसएलपेक्षा अधिक चांगली असते. आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशांची त्यांच्या देशातील क्रिकेटची पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी गुंतवणूक केल्याबद्दलही अक्रम यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कौतुक केले. ('IPL 2019 मध्ये इंग्लंड खेळाडूंना खेळण्यास मान्यता देणे विश्वचषक योजनेचा एक भाग होता', वर्ल्ड कप विजेता इयन मॉर्गनचा इंटरेस्टिंग खुलासा)
"आयपीएल आणि पीएसएल दरम्यान फरक आहे. गेल्या पाच-सहा वर्षात, यात मोठा फरक आहे. त्यांनी खूप पैसा गुंतवला आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे," अक्रमने तनवीर अहमदला YouTube चॅनलवरील मुलाखतीत सांगितले. "खेळाडूंचे खरेदी करण्यासाठी संघाचे बजेट फक्त 60-80 कोटी असते ... भारतीय चलन ... आमच्या चलनाच्या दुप्पट. अशा प्रकारच्या पैशाने जेव्हा नफा होतो तेव्हा बीसीसीआय पुन्हा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुंतवणूक करतो," ते म्हणाले. सध्याचे अनेक भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीगची देण आहेत.
जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, दीपक चाहरसह टी-20 लीगमध्ये आपापल्या संघात चमकदार कामगिरी करण्याबरोबरच भारतीय संघात स्थान मिळविण्याकरिता देशांतर्गत सर्किटमध्येही चांगली कामगिरी केली. प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटूची नेमणूक केल्याने आयपीएलमध्ये भारताची प्रगती झाली आहे. “आयपीएलमधील बहुतेक खेळाडूंचे प्रवीण अमरे यांच्यासारखे वैयक्तिक प्रशिक्षक असतात. त्यांनी अशा प्रकारचे माजी क्रिकेटपटू घेतले आहेत जे चांगले प्रशिक्षक बनले आहेत. तुम्ही त्यांच्या फलंदाजांकडे पहा, ते इतक्या मोठ्या आत्मविश्वासाने खेळतात. ही व्यवस्था पूर्णपणे वेगळी आहे," पाकिस्तानच्या दिग्गजाने म्हटले.