IPL मध्ये ‘या’ टीमला सर्वाधिक वेळा करावा लागला पराभवाचा सामना, पहा तुमचा आवडता संघ आहे कोणत्या स्थानावर
रोहित शर्मा टीममेटसह सेलिब्रेट करतो (Photo Credits: IANS)

IPLभारतात 2008 पासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) 13 हंगाम पूर्ण झाले आहे. यादरम्यान, सुरुवातीच्या मोसमात संघर्ष करणारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आज स्पर्धेतील सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणून उदयास आली आहे. मुंबईकर फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने एक नाही तर तब्बल पाच वेळा आयपीएलच्या (IPL) विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. इतकेच नाही तर स्पर्धेत 100 वेळा अधिक सामन्यात विजय मिळवणाऱ्या दोन संघांपैकी मुंबई एक प्रसिद्ध फ्रँचायझी आहेत. मुंबईने आयपीएलमध्ये 5 तर चेन्नई सुपर किंग्सने 3 विजेतेपद जिंकले आहेत. मात्र, असे काही संघ आहेत ज्यांना आजवर स्पर्धेत सर्वाधिक पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे काही संघांनी पराभवात शंभरीचा आकडा देखील गाठला आहे. आज आपण अशाच संघांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. (IPL 2021: एका आयपीएल मोसमात 300 पेक्षा अधिक धावा व हॅट्रिक घेणारा Mumbai Indians चा ‘हा’ तडाखेबाज फलंदाज एकमेव क्रिकेटर, नाव जाणून विश्वास बसणार नाही)

1. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आजवर  संघाचा सर्वाधिक पराभव झाला आहे तर तो दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आहे. दिल्ली संघाने आयपीएलमध्ये 196 सामने खेळले असून त्यांनी 85 सामन्यात विजय मिळवला आहे तर तब्बल 106 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.

2. या यादीत दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स (Punjab Kings) आहेत ज्यांचा 192 आयपीएल सामन्यात 86 विजय आणि 102 मॅचमध्ये पराभव झाला आहे.

3. यादीत तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आहे. बेंगलोरस्थित फ्रँचायझीने आयपीएलमध्ये 198 सामने खेळले असून 91 मध्ये विजय आणि 100 पराभवाची चव चाखली आहे.

दरम्यान, दिल्ली, पंजाब आणि बंगलोर संघ या नकोशा यादीत पहिले तीन टीम आहेत तर अन्य संघांनी अद्याप पराभवाची शंभरी गाठलेली नाही. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 91, गेतविजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 82 आयपीएल सामने गमावले आहेत. विशेष म्हणजे मुंबई 200 पेक्षा अधिक आयपीएल सामने खेळणारी एकमेव टीम आहे. त्यांनतर राजस्थान रॉयल्स (78), चेन्नई सुपर किंग्स (72), तर सनरायझर्स हैदराबाद (58) पराभवासह यादीत अखेरच्या स्थानी विराजमान आहे.