IPL 2024: लखनौ संघासाठी खूशखबर, आयपीएल आधी केएल राहुलच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट
KL Rahul (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीग 2024 (Indian Premier League) चा रणसंग्राम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी सर्व संघाची जोरदार तयारी सुरु आहे. काही खेळाडू दुखापतीमुळे यंदाची आयपीएल मुकणार आहेत यादरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलशी (KL Rahul) संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. केएल राहुलला इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधाराला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) फिटनेस प्रमाणपत्र दिले आहे. (हेही वाचा - RCB Win WPL 2024: स्मृती मंधानाने पूर्ण केले आरसीबी चाहत्यांचे स्वप्न, 16 वर्षांत पहिल्यांदाच जिंकली ट्रॉफी)

लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज केएल राहुल गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीतून सावरत आहे. यामुळे केएल राहुल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. ही गोष्ट लखनौच्या संघाला आणि राहुलच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केएल राहुल आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. एक-दोन दिवसांत तो संघात सामील होईल. लखनऊ सुपर जायंट्स त्यांच्या आयपीएल मोहिमेला रविवारी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध सुरुवात करणार आहे.

पाहा पोस्ट -

बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाने केएल राहुलला आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात विकेटकिपिंग न करण्याचा सल्ला दिला आहे. आयपीएलच्या सुरुवातीचे काही सामने केएल राहुलने फक्त फलंदाज म्हणून खेळण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे.