आर अश्विन आणि शिमरॉन हेटमायर (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs LSG Match 20: आयपीएलच्या (IPL) 15 सीझनच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूला रिटायर्ड हर्ट केले गेले. लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध आयपीएल 2022 च्या 20 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) रिटायर्ड होण्याचा निर्णय घेतला. अश्विनने लीगमध्ये पहिल्यांदाच असा धाडसी निर्णय घेतला आहे. अश्विनच्या या निर्णयानंतर 'रिटायर्ड आऊट' हा शब्द सोशल मीडियावरही ट्रेंड होऊ लागला. यानंतर वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज क्रिकेटपटू इयान बिशपने ट्विट केले की ही एक उत्तम टी-20 रणनीती आहे. 21 व्या शतकात टी-20 फॉरमॅट आपल्याला सांगत आहे की आपण कसा विचार करू शकतो आणि खेळ कसा बदलू शकतो. (IPL 2022, RR vs LSG Match 20: राजस्थानने लखनऊ संघासमोर ठेवले 166 धावांचे लक्ष्य, शिमरॉन हेटमायर याच्या दमदार अर्धशतकाने लावली संघाची नौका पार)

राजस्थानने 67 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्क्ल आणि रसी व्हॅन डर डुसेन पॅव्हिलियनमध्ये परतले होते. यानंतर राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाने रविचंद्रन अश्विन याला रियान परागच्या वर पाठवले. राजस्थानचा हा निर्णय योग्य ठरला. आणि शिमरॉन हेटमायरसह अश्विनने चांगली फलंदाजी करत विकेट पडण्याचे सत्र रोखले आणि दोघांनी मिळून धावफलक हलता ठेवला. नंतर अश्विनला वाटले की रियान पराग याची फलंडनजी अजून शिल्लक आहे आणि तो त्याच्यापेक्षा चांगले शॉट मारू शकतो, म्हणून त्याने रिटायर्ड होण्याचा निर्णय घेतला. अश्विनने हेटमायरसोबत 68 धावांची भागीदारी केली. जेव्हा अश्विन पंच आणि लखनऊचा कर्णधार केएल राहुल यांना न सांगता तंबूत परतला तेव्हा राजस्थानची धावसंख्या 135 धावा होती. अश्विन 23 चेंडूत 28 धावा करून निवृत्त झाला. या खेळीत त्याने दोन षटकार मारले.

यानंतर रियान पराग मैदानात उतरला आणि त्याने शिमरॉन हेटमायरच्या साथीने राजस्थानला 165 धावांपर्यंत मजल मारून दिली. हेटमायरने 36 चेंडूत एक चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 59 धावांची नाबाद खेळी खेळली.  हेटमायरने डावानंतरच्या विश्रांतीदरम्यान सांगितले की, मला अश्विनच्या निर्णयाची कल्पना नव्हती. अश्विनला मैदानाबाहेर पळत जाताना तो फलंदाजी करत असल्याचे त्याने सांगितले. रिटायर्ड आऊट होणे हा शहाणपणाचा किंवा हुशार निर्णय आहे. निवृत्त झाल्यानंतर फलंदाज पुन्हा संघाला गरज पडल्यास फलंदाजीला उतरू शकतो.