विराट कोहली (Photo Credit: PTI)

IPL 2022, RCB vs GT: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट शांत आहे, परंतु आता जर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर त्यांना आज गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) मोठा विजय मिळवणे आवश्यक आहे. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांची नजर संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीवर असेल. एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. या सामन्यात विराट कोहलीने 57 धावा केल्या तर तो आरसीबी (RCB) फ्रँचायझीसाठी 7000 धावांचा आकडा गाठेल. विराट प्रत्येक IPL हंगामात एका फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव खेळाडू आहे. फ्रँचायझीने त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याला पाठिंबा दिला आणि आयपीएल (IPL) 2011 मेगा लिलावापूर्वी कोहली आरसीबीचा रिटेन केलेला खेळाडू होता. (IPL 2022: आजच्या मॅचमध्ये RCB जिंकल्यास आयपीएल प्लेऑफचं कसं असेल समीकरण? दोन संघांचा होणार पत्ता कट, DC वरही टांगती तलवार)

विराट कोहलीने हा मैलाचा दगड गाठला तर तो आयपीएलच्या इतिहासात एका फ्रँचायझी संघासाठी 7000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. लक्षणीय आहे की विराटने या धावा आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगच्या संयोजनात केल्या आहेत. आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर विराटने 220 सामन्यांमध्ये 6519 धावा केल्या आहेत, तर चॅम्पियन्स लीगमध्ये 424 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. विराटने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी 36.22 च्या सरासरीने आणि 129.27 च्या स्ट्राइक रेटने 6519 धावा केल्या आहेत. विराटने या कालावधीत 5 शतके आणि 43 अर्धशतके झळकावली आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये असा कोणताही फ्रेंचायझी संघ नाही, ज्यासाठी कोणत्याही फलंदाजाने 7000 धावांचा टप्पा गाठला आहे.

दुसरीकडे, बेंगलोरचे आयपीएल प्लेऑफचे भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून असेल. जर आरसीबीने गुजरात टायटन्स (GT) कडून पराभूत झाले तर ते या हंगामात प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडतील आणि जिंकल्यास आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील त्यांच्या आशा पल्लवित राहतील. रॉयल चॅलेंजर्सला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मोठा विजय आवश्यक आहे. या मोसमात आरसीबीचे सात सामने जिंकले आहेत तर सहा मॅचमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबीला त्याचा -0.323 चा नेट रनरेट त्रासदायक ठरू शकतो. गुजरात विरुद्धचा विजय त्यांना 16 गुणांवर नेईल परंतु ते पुरेसे नसेल कारण त्यांना प्लेऑफ प्रवाहस करण्यासाठी अन्य संघांच्या काही अनुकूल निकालांची देखील आवश्यकता आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला.