IPL 2022 Playoff Scenario: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मधील सर्वात आतुरतेने अपेक्षीत सामन्याचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. आयपीएलच्या (IPL) 33 व्या सामन्यात, रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना थोड्याच वेळात रवींद्र जडेजाच्या चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) होईल. आयपीएल पॉइंट टेबलमधील (IPL Points Table) दोन सर्वात खराब संघांमधील आगामी सामना मनोरंजक असेल, कारण MI प्रथमच जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर CSK आयपीएल 2022 प्लेऑफचे (IPL Playoffs) आव्हान कायम ठेवण्याच्या निर्धारित असेल. दरम्यान, आयपीएलच्या दोन सर्वात यशस्वी संघांनी 15 व्या आवृत्तीची निराशनजक सुरुवात केली, परिणामी ते पिछाडीवर पडले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये सर्वात खालच्या दोन स्थानांवर विराजमान आहेत. CSK ने आत्तापर्यंत त्यांच्या सहा सामन्यांपैकी फक्त एकच जिंकला आहे, परंतु मुंबईने 2022 मध्ये त्यांचे सर्व सहा गेम गमावले आहेत. (IPL 2022 Points Table Updated: गुणतालिकेत गुजरातचे वर्चस्व कायम, दिल्लीने पंजाबविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर अशी आहे पॉईंट टेबलची स्थिती)
मुंबई इंडियन्सने या मोसमात खेळलेले सर्व सहा सामने गमावले आहेत. स्पर्धेच्या इतिहासात सलग सहा सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाचा नेट रनरेट -1.048 आहे, जो आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंतचा सर्वात खराब आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सला सर्व 8 सामने जिंकावे लागतील आणि ते देखील मोठ्या फरकाने, ज्यामुळे सध्याचा नकारात्मक रनरेट सकारात्मक मध्ये बदलेल आणि त्यांच्या प्लेऑफच्या आशा पल्लवित राहतील. दुसरीकडे, आयपीएल 2022 मध्ये रवींद्र जडेजाच्या नेतृत्वातील संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध फक्त एकच विजय मिळवला आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्याकडून पराभवाची चव चाखली आहेत. CSK सध्या 2010 नंतर दुसऱ्यांदा सलग चार सामने खेळून गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. आणि प्लेऑफमध्ये त्यांची सर्वात मोठी संधी म्हणजे त्यांनी त्यांच्या उर्वरित आठ सामन्यांपैकी सात जिंकणे आवश्यक आहे. याशिवाय अन्य संघांवरही त्यांना बारकाईने लक्ष ठेवावे लागेल.
दोन्ही संघांनी आतापर्यंत 6-6 सामने खेळले आहेत, मुंबईने गुण खाते उघडले नाही तर चेन्नईचे 2 गुण आहेत. अशा स्थितीत एका पराभवानंतर दोन्ही संघांसाठी पुढील वाटचाल कठीण होईल. दोन्ही संघांचे अजून 8 सामने बाकी आहेत, त्यामुळे दोन्ही संघांनी येथून विजय मिळवण्यास सुरुवात केली तर त्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल आणि अंतिम 4 मध्ये पोहोचणे शक्य होईल. मात्र त्यासाठी दोन्ही संघांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील, जे अवघड नक्कीच असले तरी अशक्य नाही.