IPL 2022, PBKS vs LSG: खेळाडूवृत्तीचे अनोखं उदाहरण! अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता Quinton de Kock ने केले वॉकआउट (Watch Video)
क्विंटन डी कॉक (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: क्रिकेट हा जगभर जेंटलमन गेम म्हणून ओळखला जातो आणि वेळो-वेळी याचे उदाहरण खेळाडूंनी मांडले आहेत. आयपीएलच्या (IPL) 15 व्या पर्वात देखील अशीच एक घटना पाहायला मिळाली, ज्याने क्रिकेट, जेंटलमन आणि खेळाडूवृत्ती या तीन शब्दांना एकत्र आणले. पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 42 व्या सामन्यात लखनौचा स्टार सलामीवीर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) मैदानावरील पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळाडूवृत्ती दाखवली आणि पॅव्हिलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. डी कॉक 37 चेंडूत 46 धावा करत चांगला खेळत होता, जेव्हा संदीप शर्माच्या (Sandeep Sharma) चेंडूचा चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागला आणि तो मैदानाबाहेर चालू लागला. (IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाब किंग्सची कसून गोलंदाजी; Quinton de Kock, दीपक हुडाची लक्षवेधी खेळी, लखनौची 153 धावांपर्यंत मजल)

डावाच्या 13व्या षटकात ही घटना घडली. त्याआधीच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकने संदीप शर्माच्या चेंडूवर चौकार ठोकला होता. 46 धावा केल्यावर दक्षिण आफ्रिकी सलामीवीर अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता आणि त्याने पुढच्या चेंडूवर कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरील बाजूस लागून विकेटकीपर जितेश शर्माकडे गेला. पंजाबचा गोलंदाज संदीप शर्माची अपील मैदानावरील पंचांनी नाकारली पण डी कॉकने वेळ वाया न घालवला तो आधीच परतीच्या मार्गावर चालू लागला. क्विंटन डी कॉकची खेळी लखनौसाठी अतिशय महत्त्वाची होती कारण डावाच्या तिसऱ्या षटकात त्यांचा कर्णधार केएल राहुल 3 धावांवर बाद झाला. 13/1 पासून डी कॉक आणि दीपक हुडा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. डी कॉकच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. आयपीएलच्या या आवृत्तीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज चांगलाच फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये 131.55 च्या स्ट्राइक रेटने दोन अर्धशतकांसह 271 धावा केल्या आहेत.

सामन्याबद्दल बोलायचे तर प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाने 20 षटकांत 8 विकेट गमावून 153 धावांपर्यंत मजल मारली. लखनौने 13 धावांमधेच पाच विकेट गमावल्या तर डी कॉक आणि दीपक हुडा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांच्या भागीदारीने संघाचा डाव सावरला. पंजाबकडून कगिसो रबाडाने 38 धावांत चार बळी घेतले. तर लेगस्पिनर राहुल चाहरने दोन आणि वेगवान गोलंदाज संदीप शर्माने एक गडी बाद करून त्याला चांगली साथ दिली.