मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझीचे घर मानल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) मध्येही रोहित शर्माची ‘पलटन’ आयपीएलच्या 15 व्या पर्वातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद करण्यात अपयशी ठरली. लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या 37 व्या सामन्यात देखील मुंबईला यंदाच्या हंगामातील सलग आठव्या पराभवाचा आस्वाद घेणे भाग पडले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आतापर्यंतच्या इतिहासात एका संघाची ही सर्वात लाजिरवाणी सुरुवात आहे. आतापर्यंत एकही संघाला अशाप्रकारच्या हाराकिरीला सामोरे जावे लागले होते. आयपीएलच्या महा लिलावानंतर पहिलाच सीजन खेळणारी मुंबई यावेळी तिन्ही विभागात प्रभाव पाडण्यात अपयशी ठरली. परिणामी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आता त्यांच्या सर्व अपेक्षा संपुष्टात आल्या आहेत. मुंबईच्या या लज्जास्पद पराभवामागे फक्त चार खेळाडू जबाबदार आहेत. (IPL 2022, MI vs LSG: सचिन तेंडुलकरला वाढदिवसाची भेट नाहीच; लखनौच्या ‘पंच’ने पराभवाचा आठवा दणका, लाजिरवाण्या पराभवाने झाला खेळ खल्लास)

1. रोहित शर्मा (Rohit Sharma)

आयपीएल इतिहासातील आताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहितची ख्याती जगभर प्रसिद्ध आहे. रोहित आयपीएलमध्ये सर्वात जास्त पाच विजेतेपद जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. पण यावर्षी रोहित आपल्या नावाला साजेसा खेळ करू शकला नाही. रोहित बॅटने देखील कोणत्याही सामन्यात फारसे योगदान देण्यात अपयशी ठरला आहे.

2. किरॉन पोलार्ड (Kieron Pollard)

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार धडाकेबाज अष्टपैलू मुंबईने लिलावापूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी होता. पोलार्ड 8 सामन्यात 115 धावाच करू शकला आणि तर त्याला फक्त तीन विकेट्स मिळाल्या आहेत. मुंबईने अनेक सामने विजयाच्या जवळ येऊन गमावले आहेत, पण या सामन्यात पोलार्डने या सामन्यात निराशा केली.

3. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

स्टार वेगवान गोलंदाज बुमराह मुंबईच्या गोलंदाजीचे नेतृत्व करतो. पण मुंबई आणि टीम इंडियाचा भविष्याचा कर्णधार पदाचा दावेदार असलेला बुमराह बॉलने फारसे योगदान देऊ शकला नाही. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट घेणारा बुमराह आतापर्यंत 8 सामन्यात फक्त 5 विकेट्स घेऊ शकला आहे. त्यामुळे मुंबईला बॉलने अपेक्षित अशी बॉलने सुरुवात मिळू शकली नाही.

4. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमारने दुखापतीतून पुनरागमन करत सुरुवातीला प्रभावी कामगिरी बजावली होती. सूर्या मुंबईकडून 6 सामन्यात सर्वाधिक 239 धावा करणारा फलंदाज आहे. त्याने या खेळीत दोन अर्धशतके देखील केली, पण मोक्याच्या क्षणी त्याच्या फलंदाजीची गती संथ होत राहिली, त्यामुळे संघ पिछाडीवर पडला.