IPL 2022, KKR vs SRH Match 25: हैदराबादविरुद्ध अजिंक्य रहाणेचा पत्ता होणार कट? ‘या’ मॅचविनरला कोलकाताच्या प्लेइंग XI मध्ये मिळू शकते पहिली संधी
अजिंक्य रहाणे (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs SRH: 33 वर्षीय अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 2018 मध्ये आपला शेवटचा व्हाईट-बॉल राष्ट्रीय रंगात सामना खेळला आणि तेव्हापासून तो संघातून बाहेर आहे. एके वेळी जागतिक क्रिकेटमधील गतिमान फलंदाज रहाणेचा प्रभाव आणि खेळण्याची शैली गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे. त्यांनतर सर्व शक्यतांविरुद्ध, कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) खेळाडूवर विश्वास दाखवला आणि रहाणेला 2022 च्या मोसमात त्यांचा पहिला पसंतीचा सलामीवीर म्हणून 1 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. आयपीएल 2022 मध्ये कोलकाता संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पाचपैकी तीन सामने जिंकून संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आणि आता सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सहाव्या सामन्यातून संघाला गुणतालिकेत पहिले स्थान पटकावायचे असेल. केकेआर (KKR) संघ हैदराबादविरुद्ध आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कमीत कमी दोन बदल करून मैदानात उतरणे अपेक्षित आहे. (IPL 2022: कमाईत हिरो, कामगिरीत झिरो! आयपीएलमधील महागड्या खेळाडूची बॅट अद्यापही थंडच; फटक्यांची प्रतिक्षा कायम)

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केकेआर सर्वात मोठा बदल म्हणून खराब फॉर्ममध्ये असलेल्या अजिंक्य रहाणेच्या जागी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याला सलामीवीर म्हणून उतरवू शकतो. फिंचला लिलावात खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही, स्पर्धेच्या तोंडावर अॅलेक्स हेल्स बाहेर पडल्यावर फिंचला अखेर संधी मिळाली, मात्र ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नाही. फिंचने भारतीय टी-20 लीगमध्ये 87 सामने खेळले असून, 25.38 च्या सरासरीने 2005 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 14 अर्धशतके देखील केली आहेत. कोलकाता नाईट रायडर्ससाठी अजिंक्य रहाणे सातत्याने फ्लॉप ठरला आहे. त्याने आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावले नसून पाच डावांमध्ये तो एकही मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे आता त्याच्या जागी फिंचला पहिली संधी दिली जाऊ शकते.

दरम्यान, रहाणे हा स्टायलिश फलंदाज होता आणि अजूनही आहे, पण तो आता टी-20 साठी फिट बसत नाही. अमान खान आणि अभिजीत तोमर यांसारखे देशांतर्गत मोठे हिटर सोबत केकेआरकडे तरुण पर्याय आहेत. रहाणेच्या खेळात बदल करायचा असेल किंवा त्याला आघाडीच्या फळीतून बाहेर काढायचे असेल तर केकेआरला धाडसी पाऊल उचलावे लागेल.