कोलकाता विरुद्ध पंजाब (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs PBKS Match 8: आयपीएलच्या (IPL) आठव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) वर्चस्वपूर्ण कामगिरी करून पंजाब किंग्स (Punjab Kings) संघावर षटकांत 33 चेंडू आणि सहा गडी राखून दमदार विजय मिळवला. उमेश यादव  (Umesh Yadav) आणि आंद्रे रसेल (Andre Russell) केकेआरच्या (KKR) विजयाचे नायक ठरले. उमेश यादवने बॉलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या तर रसेलने 31 चेंडू नाबाद 70 धावांची झंझावाती खेळी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. रसेलशिवाय सॅम बिलिंग्स याने नाबाद 24 धावांचे योगदान दिले. केकेआरने चार विकेट झटपट गमावल्यावर रसेलने बिलिंग्सच्या साथीने संघाला विजयीरेष ओलांडून देत महत्वपूर्ण दोन पॉईंट संघाच्या झोळीत पाडले. दुसरीकडे, पंजाबसाठी फलंदाजांच्या निराशनजक खेळीनंतर गोलंदाजांनी सुरुवातीला यश मिळवून दिले, पण रसेल आणि बिलिंग्स यांच्या वादळी खेळीने त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. राहुल चाहरने सर्वाधिक दोन तर ओडियन स्मिथ आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी एक गडी बाद केला. (IPL 2022, KKR vs PBKS Match 8: शाहरुख खान आऊट होताच Suhana Khan हिची उत्साही रिअक्शन, तर अनन्या पांडेने दिली अशी प्रतिक्रिया Watch Video)

पंजाबने दिलेल्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाताने आश्वासक सुरुवात केली. 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली. पॉवरप्लेच्या 6 षटकांत संघाने 2 गडी गमावून 51 धावा केल्या. अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर पॉवरप्लेमध्ये माघारी परतले. तर श्रेयस अय्यर आणि नितीश राणा चाहरच्या एकाच षटकांत बाद झाले. आणि केकेआरची स्थितीत 51 धावांवर 4 बाद अशी असताना रसेल आणि बिलिंग्स यांनी मोर्चा सांभाळला. कोलकाताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने हरप्रीत ब्रारच्या षटकात दोन षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. ओडियन स्मिथच्या दुसऱ्या षटकात रसेलने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. या षटकात स्मिथने 30 धावा लुटल्या.

यापूर्वी केकेआरकडून उमेश यादवने 4 बळी घेतले. उमेशने 23 धावांत चार, तर टिम साउदीने 36 धावांत दोन बळी घेतले. पंजाब किंग्जने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या आणि संघ 18.2 षटकांत ढेर झाला. पंजाब संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या भानुका राजपक्षे याने 31 आणि शिखर धवन 16 धावांच्या खेळीत दुसऱ्या विकेटसाठी 41 धावांची सर्वात मोठी भागीदारी केली. तसेच राजपक्षेशिवाय फक्त कागिसो रबाडा 20 धावांचा टप्पा पार करू शकला.