आयपीएल (IPL) 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेट स्टार एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) प्रमाणेच एका युवा भारतीय फलंदाजाने 360 फलंदाजी केली. भारतात जन्मलेला हा 23 वर्षीय खेळाडू अशी फलंदाजी करेल यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. गुजरातने लखनऊचा पाच विकेट्सने पराभव केला. यासह केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वातील लखनऊने स्पर्धेतील पराभवाने सुरुवात केली असली तरी या सामन्यात आयुष बडोनी (Ayush Badoni) भारताचा डिव्हिलियर्स म्हणून उदयास आला. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 पूर्वी आयुष बडोनी हे नाव अनोळखे होते. 2018 मध्ये भारताच्या अंडर-19 संघाकडून खेळल्यानंतर हा फलंदाज बराच काळ विस्मृतीत राहिला. लिस्ट ए आणि फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणे त्याच्यासाठी खूप कष्टाचे राहिले आहे. (IPL 2022, LSG vs DC: क्या बात! Ayush Badoni याने एक चौकार आणि षटकार खेचून लखनऊच्या विजयी हॅटट्रिकवर केला शिक्कामोर्तब Watch Video)
आणि आता ठसा उमटवण्यासाठी तीन वर्षांच्या सतत संघर्षानंतर बडोनीची तुलना महान एबी डिव्हिलियर्सशी केली जात आहे. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात त्याला मोठी रक्कम मिळेल अशी अपेक्षा नव्हती आणि तसेच घडले. दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या बडोनीसाठी फ्रँचायझीने बोली लावली नाही. पण तरीही, लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) त्याला त्याच्या 20 लाखांच्या मूळ किमतीत सामील करून घेतले आणि हा निर्णय त्यांच्या फायद्याचा ठरला. लखनऊच्या पहिल्याच सामन्यात त्याने गुजरात लायन्सविरुद्ध दडपणाखाली अर्धशतक झळकावले. संघाने तो सामना गमावला असला तरी कर्णधार केएल राहुल समवेत अनेकांनी त्याची पाठ थोपटली. परंतु बडोनीला उच्च-श्रेणीचा फलंदाज बनण्यासाठी दीर्घ कालावधीसाठी त्याचे सातत्य दाखवण्याची गरज आहे.
याशिवाय लखनऊच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 22 वर्षीय खेळाडूने पहिले कव्हर्सवर चौकार मारला आणि नंतर शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर त्याच क्षेत्रातून एक उत्तुंग षटकार ठोकला व संघाच्या झोळीत तिसरा विजय पाडला. आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 150 च्या वर स्ट्राइक रेटने फलंदाजी केलेल्या बडोनीने केवळ दबावाखाली धावा काढण्याचे कौशल्यच दाखवले नाही, तर धावा काढण्याची क्षमताही दाखवली. यादरम्यान, दिल्लीविरुद्ध विजयी धावा केल्यावर बडोनी विराट कोहलीच्या सेलिब्रेशनच्या शैलीची नक्कल करण्यापासून मागे राहिले नाही. दरम्यान, आशिया चषक 2018 स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध भारताच्या अंडर-19 संघासाठी त्याने अवघ्या 28 चेंडूत 52 धावा करून हा युवा फलंदाज प्रकाशझोतात आला. आयुष बडोनी हा गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे आणि खालच्या फळीत उपयुक्त डाव खेळण्यात तो एक पटाईत आहे.