IPL 2022, GT vs SRH: आयपीएलचा नवीन वंडरबॉय अभिषेक शर्माने T20 च्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला धु..धु.. धुतलं, दोन षटकार मारत पूर्ण केले अर्धशतक; पाहा व्हिडिओ
अभिषेक शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2022, GT vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) सलामी फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) चालू हंगामात खेळण्याचा भरपूर आनंद लुटत आहे आणि त्याने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 40 व्या सामन्यात हंगामातील दुसरे अर्धशतक केले. यादरम्यान त्याने गुजरात टायटन्सचा (जीटी) दिग्गज गोलंदाज राशिद खानला (Rashid Khan) चितपट करून आपले अर्धशतक पूर्ण केले. शर्मा सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 10 फलंदाजांमध्ये आहे. सामन्याच्या 12व्या षटकात अभिषेकने षटकाराने सुरुवात केली आणि त्यानंतर एकेरी केली. अभिषेकने पुन्हा एकदा राशिदला षटकार खेचून षटक संपवण्यासाठी पुढाकार घेण्याआधी दुसऱ्या टोकाला त्याचा जोडीदार एडन मार्करमने त्याला आणखी तीन स्ट्राइक रोटेट करून साथ दिली. (IPL 2022, GT vs SRH Match 40: अभिषेक शर्मा -एडन मार्करमचे विस्फोटक अर्धशतक, हैदराबादचे गुजरातसमोर 196 धावांचे भव्य आव्हान)

21 वर्षीय युवा फलंदाज अभिषेकने 33 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. राशिद खानच्या षटकात दोन षटकार मारत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. राशिदच्या या षटकात हैदराबादच्या फलंदाजांनी 16 धावा लुटल्या. अभिषेकला मार्करमचीही चांगली साथ मिळाली. दोन्ही फलंदाजांनी 61 चेंडूत 96 धावांची शानदार भागीदारी केली. पण अल्झारी जोसेफने अभिषेकचा त्रिफळा उडून ही भागीदारी मोडली. हैदराबादच्या युवा फलंदाजाने 42 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. संघाच्या 140 धावांवर तिसरी विकेट म्हणून अभिषेक बाद झाला. अभिषेकने 33 चेंडूंमध्ये आयपीएलमधील दुसरे अर्धशतक झळकावले ज्यात पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.

दरम्यान, यावर्षी आयपीएलमध्ये एकूण 75 च्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसह त्याने आठ डावात 285 धावा केल्या आहेत. तसेच चालू हंगामात अभिषेकची सरासरी 35.62 आहे. हैदराबादने पहिले दोन विकेट झटपट गमावल्यावर अभिषेकने मार्करमसोबत अर्धशतकी भागीदारी करून संघाचा फक्त डावच सांभाळला नाही तर दोंघांनी संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मार्करम 40 चेंडूंत 3 षटकार आणि दोन चौकारांसह 56 धावांवर बाद झाला.