IPL 2022, GT vs SRH Match 40: अभिषेक शर्मा -एडन मार्करमचे विस्फोटक अर्धशतक, हैदराबादचे गुजरातसमोर 196 धावांचे भव्य आव्हान
IPL 2022, GT vs SRH: अभिषेक शर्मा आणि एडन मार्करमच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सनरायझर्सने निर्धारित षटकांत 6 बाद 195 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे गुजरात टायटन्सपुढे विजयासाठी 196 धावांचे लक्ष्य आहे. अभिषेकने सर्वाधिक 65 धावा केल्या तर मार्करमने 56 धावा केल्या आहेत. शशांकने 6 चेंडूत 25 धावांची नाबाद खेळी केली. दुसरीकडे, गुजरातसाठी मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
IPL 2022, GT vs SRH Match 40: अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि एडन मार्करम (Aiden Markram) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) निर्धारित षटकांत 6 बाद 195 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे आता गुजरात टायटन्सपुढे (Gujarat Titans) विजयासाठी 196 धावांचे लक्ष्य आहे. अभिषेकने सर्वाधिक 65 धावा केल्या तर मार्करमने 56 धावा केल्या आहेत. याशिवाय शशांक सिंहने (Shashank) डावातील अंतिम षटकांत चौकार-षटकरांची आतषबाजी करून हैदराबादला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारू दिली. लॉकी फर्ग्युसनच्या अंतिम ओव्हरमध्ये त्याने 25 धावा चोपल्या. शशांकने 6 चेंडूत 25 धावांची नाबाद खेळी केली. दुसरीकडे, गुजरातसाठी मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तसेच यश दयाल आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या.
Innings Break!
Incredible batting this by @SunRisers as they put up a total of 195/6 on the board.
Scorecard - https://t.co/TTOg8b6LG3 #GTvSRH #TATAIPL pic.twitter.com/ZeiUzzqQlA
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2022 09:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

