आयपीएल (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामात दोन नवीन संघ दाखल होणार आहेत. आयपीएलचे दोन नवीन संघ (IPL New Teams) खरेदी करण्यासाठी अनेक दावेदार पुढे येत आहेत, परंतु बातमीनुसार आता फुटबॉलचा (Football) सर्वात प्रसिद्ध क्लब, मँचेस्टर युनायटेड (Manchester United), देखील या शर्यतीत सामील झाला आहे. ग्लेझर कुटुंब फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचा मालक आहे. नवीन संघ खरेदी करण्यात क्लबच्या स्वारस्यामुळे बीसीसीआयने निविदा (BCCI tender) तारीख वाढवली असल्याचे मानले जात आहे. फुटबॉल दिग्गज क्रिस्तियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळतो. भारताचे अनेक क्रिकेटपटू देखील या क्लबचे चाहते आहेत आणि अलीकडे जसप्रीत बुमराह देखील मँचेस्टरच्या जर्सीमध्ये दिसला होता. बीसीसीआयने दोन नवीन फ्रँचायझींना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिणामी पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेपूर्वी मेगा लिलावही होणार आहे. (BCCI ने IPL संघाची मालकी आणि संचालन करण्यासाठी जाहीर केली निविदा, प्रक्रियेची दुसऱ्यांदा केली मुदत वाढवली)

मँचेस्टर युनायटेडच्या मालकांनी कथितपणे बीसीसीआयने जारी केलेले आमंत्रण टेंडर (ITT) खरेदी केले आहे. क्लब मालक या प्रकरणातील घडामोडींचा मागोवा घेत आहेत. दरम्यान ANI वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की आयटीटीची मुदत वाढ करण्यात ग्लेझरने मुख्य भूमिका बजावली आहे.  बीसीसीआयने अलीकडेच नवीन फ्रँचायझीसाठी आयटीटी जारी केले. आयआयटीमध्ये ऑक्टोबर अखेरीसाजूक आठवड्यापर्यंत अंतिम बोली लावण्यास सांगितली आहे. बोलीदारांनी सरासरी 3000 कोटी रुपयांची उलाढाल किंवा 2500 कोटी रुपयांची संपत्ती असणे अपेक्षित आहे. हे निकष असलेले बोलीदारच बोली लावण्यास पात्र असतील. तथापि, काही संभाव्य बोलीदारांनी बीसीसीआयला पात्रता निकषांमध्ये मूल्य कमी करण्याचा आग्रह केल्यानंतर बीसीसीआयने सरासरी उलाढालीच्या कलमावर पुन्हा काम केले आहे. बीसीसीआयने परदेशी संस्थांना आयटीटी खरेदी करण्याची आणि बोली सादर करण्याची परवानगी दिली आहे. तथापि, जर त्यांनी बोली जिंकली तर त्यांना भारतात एक कंपनी स्थापन करावी लागेल अशी अट घातली आहे.

बीसीसीआय कडून आयटीटी घेणाऱ्यांमध्ये अदानी ग्रुप, टोरेंट फार्मा, अरबिंदो फार्मा, RP-संजीव गोयंका ग्रुप, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, जिंदाल स्टील आणि उद्योजक रॉनी स्क्रूवाला यांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. नवीन फ्रँचायझीत गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक आवडती शहरे म्हणजे अहमदाबाद, लखनौ, गुवाहाटी, कटक, इंदूर आणि धर्मशाला मानली जात आहेत. तथापि 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांची क्षमता असलेल्या नव्याने बांधलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.