
चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) दिग्गज एमएस धोनी (MS Dhoni) हा विराट कोहलीनंतर टी20 मध्ये कर्णधार म्हणून 6000 धावा करणारा दुसरा कर्णधार ठरला. मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे रविवार, 8 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध CSK च्या सामन्यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) कोहलीसोबत अनोख्या यादीत सामील होण्यासाठी 40 वर्षीय फलंदाज फक्त चार धावा दूर होता. CSK प्रथम फलंदाजीला बोलावल्यानंतर मिचेल मार्शने शिवम दुबेला केल्यानंतर 18 व्या षटकात धोनी क्रीजवर आला, ज्याने 19 चेंडूत दोन चौकार आणि षटकारांत 32 धावा केल्या. धोनीने मार्शच्या चेंडूवर डॉट बॉल खेळून आपल्या खेळीची सुरुवात केली, त्यानंतर त्याने अत्यंत सहजतेने लाँग-ऑनच्या दिशेनेवर जबरदस्त षटकार मारून गोलंदाजाला तडाखा दिला. (IPL 2022: विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर संतापले सुनील गावस्कर, म्हणाले- ‘ब्रेक घ्यायचा तर आत्ताच घे’)
या शॉटमुळे धोनी 33 वर्षीय कोहलीच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला. धोनीने दिल्लीविरुद्ध आठ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह 21धावांची नाबाद खेळी केली आणि सुपर किंग्जला कॅपिटल्ससमोर 209 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य गाठण्यास मदत केली. कर्णधार म्हणून सर्वाधिक टी-20 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली 6451 धावांसह अव्वल स्थानावर आहे. तर धोनी दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबई इंडियन्सचा स्टार कर्णधार रोहित शर्मा 4721 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, आता धोनी आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करण्यापासून 91 धावांनी पिछाडीवर आहे. कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, सुरेश रैना आणि एबी डिव्हिलियर्स यांनी या टी-20 लीग स्पर्धेत मैलाचा दगड आधीच पूर्ण केला आहे. आयपीएलमध्ये धोनीने 231 सामन्यांमध्ये 4909 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 226 षटकार मारले आहेत.
दरम्यान दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे तर चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करत 208 धावांचा डोंगर उभारला आहे. चेन्नईकडून डेव्हॉन कॉन्वेने 49 चेंडूत 87 धावांची धमाकेदार खेळी खेळली. शेवटी, धोनीने संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. याशिवाय, CSK ने कॅपिटल्सविरुद्धचा सामना गमावल्यास, आयपीएल 2022 मधून बाद होणारा मुंबई इंडियन्स (MI) नंतर अधिकृतपणे दुसरा संघ असेल. सीएसकेने सध्या तीन सामने जिंकले आहेत आणि -0.431च्या नेट रनरेट सोबत गुणतालिकेत नवव्या स्थानावर बसले आहेत.