कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघ शुक्रवारी आयपीएल (IPL) 2022 च्या आठव्या सामन्यात आमनेसामने येतील. मागील सामन्यात कोलकाता संघाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून तीन विकेट्सने पराभव पत्करावा लागला. संघ कमी धावसंख्या करूनही आरसीबीला (RCB) टक्कर देऊन सामना अंतिम षटकापर्यंत नेण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे, पंजाबने विजयासह त्यांच्या मोहिमेची सुरुवात केली, पण पहिल्या सामन्यात गोलंदाजांनी 200 हून अधिक धावा लुटल्या त्यामुळे यावेळी त्यांना गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. अशा परिस्थतीत आपला सलग विजय मिळवण्याच्या निर्धारित असलेल्या पंजाबसाठी खुशखबर म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) तीन दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर पहिला सामना खेळण्याची शक्यता आहे. (IPL 2022, PBKS vs RCB: शाहरुख खान - Odean Smith याची आतषबाजी, रॉयल चॅलेंजर्सवर 5 विकेट्स राखून पंजाबचा दणदणीत विजय!)
रबाडाची वेगवान गोलंदाज कोणत्याची संघाचे सुरुवातीला आणि अंतिम षटकांत गणित बिघडवण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे पंजाब दुसरा विजय मिळवण्याच्या हेतूने निश्चित रबाडाला खेळण्यास संधी देऊ शकते. कोलकाताविरुद्ध रबाडाला पंजाब प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास संघाची गोलंदाजी आणखी मजबूत होईल. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे, त्यामुळे रबाडा अधिक प्रभावी ठरू शकतो. वानखेडेच्या खेळपट्टीवर केवळ दोनच सामने झाले असून ते पाहता फलंदाजी सोपी राहिलेली नाही असे दिसत आहे. दोन महिने चालणार्या आयपीएलसाठी ही कदाचित सुरुवात असेल पण सामन्याच्या निकालात नाणेफेक आधीच महत्त्वाची भूमिका बजावत आहे कारण दवामुळे सामन्याच्या दुसऱ्या डावावर परिणाम होत आहे. रबाडायाला पंजाबने आयपीएल लिलावात 9.25 कोटी रुपयांत खरेदी केले होते. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर तीन दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण केल्यावर रबाडा पंजाबच्या संघात झाला.
The customary 𝒃𝒖𝒓𝒓𝒂𝒉 from KG to start off his first training session with us 🔥😍#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ @KagisoRabada25 pic.twitter.com/3UXaDgC1Yl
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 30, 2022
रबाडा 2018 ते 2021 पर्यंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आणि आयपीएल 2022 महा लिलावात पंजाबच्या ताफ्यात सामील झाला. फ्रँचायझीने त्याला पुन्हा संघात समाविष्ट करण्यासाठी उत्सुक होती आणि त्याची किंमत 8 कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर शर्यतीत सामील झाली. त्यांनी फक्त तीन बोली लावल्या आणि अखेरीस पंजाबने त्याला 9.25 कोटी रुपयांत खरेदी केले. रबाडा निश्चितपणे विकेट घेणारा गोलंदाज असून त्याने 50 आयपीएल सामन्यांमध्ये 76 विकेट घेतल्या आहेत. त्याने 2020 मध्ये 17 सामन्यांत 30 विकेट्स घेऊन पर्पल कॅप पटकावली होती.