IPL Trophy (Photo Credit : PTI)

IPL 2022 Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 व्या सीजनसाठी खेळाडूंचा लिलाव यंदा 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगलोर (Bengaluru) येथे होणार आहे. यावेळच्या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असल्याने हा लिलाव खूपच रंजक असणार आहे. बेंगलोर येथे होणाऱ्या या लिलावाची तयारी आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. बीसीसीआयने (BCCI) अंतिम लिलाव यादीत एकूण 590 क्रिकेटपटूंचा समावेश केला आहे. या लिलावात एकूण 370 भारतीय खेळाडू आणि 220 परदेशी क्रिकेटपटू सहभागी होणार असून त्यापैकी 48 खेळाडूंनी 2 कोटी रुपयांच्या श्रेणीत आहेत. मागील अनेक वर्षांपासून आयपीएलचे (IPL) मुख्य प्रायोजक असलेली चिनी मोबाईल कंपनी VIVO ने आपले प्रायोजकत्व मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतातील अग्रगण्य व्यवसायिक समूह Tata आयपीएलचे नवे मुख्य प्रायोजक असतील. IPL 2022 मेगा लिलावापूर्वी, आपण या कार्यक्रमाविषयी काही तपशील जाणून घ्या. (Women's IPL वर सौरव गांगुलीची मोठी घोषणा, BCCI 2023 मध्ये सुरू करणार संपूर्ण महिला आयपीएल; पाहा काय म्हणाले)

आयपीएल लिलाव 2022 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी असे दोन दिवस चालेल आणि बेंगलोर येथे होणार आहे. IPL 2022 मेगा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 111 वाजता सुरू होईल. यावर्षापासून एकूण 10 संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे लिलावापूर्वी दोन नवीन फ्रँचायझी - लखनौ सुपर जायंट्स आणि अहमदाबाद संघ (अहाबाद टायटन्स) यांना रिलीज केलेल्या खेळाडूंच्या गटातून प्रत्येकी तीन क्रिकेटपटू निवडण्याची संधी मिळाली. आणि लखनौने कर्णधार म्हणून केएल राहुलची निवड केली आणि मार्कस स्टॉइनिस व रवी बिश्नोई यांना ताफ्यात सामील केले तर अहमदाबादने हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून निवड केली आणि शुभमन गिल व राशिद खान यांनाही निवडले.

रविचंद्रन अश्विन, डेविड वॉर्नर, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, दीपक चाहर, वॉशिंग्टन सुंदर, अजिंक्य रहाणे यांसारख्या काही सर्वोत्तम भारतीय खेळाडूंवर लिलावात अनेक फ्रँचायझी बोली लावतील. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल सध्या या वर्षीच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू आहे. लखनौने राहुलला 17 कोटी रुपयात कर्णधार म्हणून संघात सामील केले आहे. तसेच यावेळी राईट टू मॅच (RTM) प्रणाली नसेल. RTM पद्धतीद्वारे फ्रँचायझी त्यांच्या माजी खेळाडूंना सर्वोच्च बोली लावून पुन्हा ताफ्यात सामील करू शकतात.