IPL 2022: ‘दिल्ली कॅपिटल्स कमजोर आहेत, त्यांचे प्लेऑफ खेळणे कठीण’, माजी भारतीय क्रिकेटपटूने केला दावा
रिषभ पंत (Photo Credit: Twitter/@StarSportsIndia)

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने गेल्या काही वर्षांत इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) चांगली कामगिरी झाली होती आणि संघ 2020 मध्ये उपविजेता ठरला. तर संघाने 2021 मध्ये प्लेऑफ फेरीत प्रवेश केला, परंतु संघ सलग दुसरा अंतिम सामना खेळू शकला नाही. आणि आता 2022 हनगंत दिल्ली संघातील बरेच खेळाडू बदलले आहेत आणि चार कायम ठेवलेल्या खेळाडूंव्यतिरिक्त संपूर्ण संघ जवळजवळ नवीन दिसत आहे. आता सीझनमधील दिल्ली संघाच्या कामगिरीबद्दल माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्राने (Aakash Chopra) आपले मत मांडले आणि त्यांच्या मते ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या नेतृत्वातील दिल्ली संघासाठी आयपीएलचा (IPL) 15 वा हंगाम खराब ठरू शकतो. आयपीएलच्या मागील अनेक हंगामात कॅपिटल्सने सर्वोत्तम संघापैकी एक म्हणून अशी आपली ओळख निर्माण केली आहे. (IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स संघाच्या डोकेदुखीत वाढ; 15 व्या हंगामापूर्वी झंझावाती सलामीवीर ‘Yo-Yo’ टेस्टमध्ये फेल)

आयपीएल 2022 मध्ये आकाश चोप्रा यांनी दिल्ली कॅपिटल्सची चांगली सुरुवात करेल याबद्दल शंका व्यक्त केली आहे. “मला या गटाबद्दल थोडी काळजी वाटते. त्यांना पहिल्या तीनपैकी दोन सामने गमावण्याची चांगली संधी आहे. त्यांनी तीनपैकी तीन गमावल्यास तुम्ही संधी नाकारू शकत नाही. कोणीतरी तुम्हाला वन-मॅन शोसह सामना जिंकून देऊ शकतो, परंतु यामुळे तुमच्या संघात आत्मविश्वास निर्माण होत नाही.” चोप्रा यांनी पुढे स्पष्ट की दिल्ली कॅपिटल्स संघ सिद्ध निकालापेक्षा आश्वासनावर बांधलेला आहे. “खालच्या फळीत रोवमन पॉवेल एक अज्ञात खेळाडू आहे. अनेक नावे सिद्धीऐवजी वचनाशी जोडलेली आहेत; कोना भारत असो, रोवमन पॉवेल असो किंवा सरफराज खान असो त्यांना यश मिळेल हे निश्चित नाही.”

दरम्यान, ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सना 5 एप्रिलपर्यंत ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श याची उणीव भासणार आहे, कारण तो पाकिस्तानविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत आपल्या देशाकडून मैदानात उतरणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त, तडाखेबाज सलामीवीर डेविड वॉर्नर 30 मार्च रोजी शेन वॉर्नच्या अंत्यसंस्कारामुळे फ्रेंचायझीसाठी तीन सामन्यांसाठी बाहेर बसण्याची शक्यता आहे. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना 27 मार्च रोजी मुंबई इंडियन्स संघाशी होणार आहे.