IPL 2022 Mega Auction: मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स ‘या’ 4 खेळाडूंना करू शकते रिटेन, स्टार खेळाडूंना टाटा बाय बाय करण्याची शक्यता
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चे उर्वरित 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळले जाणार असताना बीसीसीआयने (BCCI) पुढील हंगामाची तयारी सुरु केली आहे. आयपीएल (IPL) 2022 साठी खेळाडूंचा मेगा लिलाव (Mega Auction) होईल आणि सध्याच्या स्टार खेळाडूंच्या संघांमध्ये अनेक बदल पाहायला मिळतील. तथापि, फ्रँचायझी संघात आपले 4 खेळाडू कायम ठेवता येणार आहेत. या 4 खेळाडूंमध्ये 2 परदेशी आणि 2 देशांतर्गत खेळाडू किंवा 1 परदेशी आणि 3 घरगुती खेळाडूंचे मिश्रण असू शकते. इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आतापर्यंतची सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने सलग दोन ट्रॉफीसह एकूण 5 आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत. (IPL 2022 Mega Auction: डिसेंबर महिन्यात होऊ शकतो मेगा लिलाव, आयपीएल फ्रँचायझींना इतक्या खेळाडूंना रिटेन करण्याची असेल परवानगी)

मुंबई इंडियन्सच्या संघात अनेक बलाढ्य खेळाडू आहेत आणि आयपीएल 2022 मेगा लिलाव त्यांच्यासाठी गैरसोय ठरेल कारण त्यांना बऱ्याच खेळाडूंना टाटा बाय-बाय करावा लागेल. तथापि, मुंबई इंडियन्सही हंगामातील आपले 4 सर्वोत्कृष्ट खेळाडू कायम ठेवू शकतात ज्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

1. रोहित शर्मा (Rohit Sharma)

आयपीएल 2022 मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स नक्कीच रोहित शर्माला रिटेन करतील. रोहित हा संघाचा कर्णधार आणि आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत तयामुळे फ्रेंचायझी त्याच्यासारखा उच्च दर्जाचा कर्णधार गमावण्याचा धोका पत्करणार नाही.

2. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

बुमराह हा दुसरा खेळाडू असावा, अशी अपेक्षा आहे. बुमराह सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे आणि आयपीएलमध्येही त्याने घातक गोलंदाजी केली आहे.27 वर्षीय गोलंदाजाने 99 आयपीएल सामन्यांमध्ये 24.14 च्या सरासरीने 115 विकेट्स काढल्या आहेत. बुमराह 2013 पासून मुंबई संघात असून तो टीमच्या मुख्य खेळाडूंपैकी एक आहे. विशेष म्हणजे लसिथ मलिंगा बाहेर पडल्यानंतर मुंबई फ्रँचायझीला आगामी सत्रात वेगवान हल्ल्याचे नेतृत्व करण्यासाठी संघात बुमराहसारख्या उत्कृष्ट वेगवान गोलंदाजची नक्कीच गरज असेल.

3. कीरोन पोलार्ड (Kieron Pollard)

मुंबई इंडियन्स लिलावापूर्वी पोलार्डला देखील संघात कायम ठेवतील. पोलार्ड हा फ्रँचायझीचा उप-कर्णधार असून टी-20 स्वरूपातील अव्वल शक्तिशाली अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. आयपीएल 2010 पासून 34 वर्षीय तडाखेबाज अष्टपैलू मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा भाग आहे.

4. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

मुंबई इंडियन्स रिटेन करू शकणारा हार्दिक चौथा खेळाडू ठरू शकतो. हार्दिक आयपीएल 2015 पासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे आणि गेल्या काही वर्षांत, 27 वर्षीय अष्टपैलूने राष्ट्रीय संघ तसेच मुंबई इंडियन्ससाठी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. लोअर-मिडल ऑर्डरमध्ये हार्दिक एक शक्तिशाली फलंदाज आहे. 2022 च्या आवृत्तीत हार्दिक सारख्या अष्टपैलू खेळाडूला गमवण्याचा विचारही फ्रँचायझी करणार नाही.

दरम्यान, मुंबई इंडियन्स संघात असेही काही खेळाडू ज्यांच्यासाठी फ्रँचायझी ‘राईट टू मॅच’ (RTM) कार्ड वापरून त्यांचा संघात पुन्हा समावेश करू शकते. यामध्ये कृणाल पांड्या, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, ईशान किशन यांचा समावेश आहे. तसेच फ्रँचायझी पियुष चावला, जयंत यादव, जेम्स नीशम, अ‍ॅडम मिल्ने, आदित्य तरे सारख्या खेळाडूंची साथ सोडू शकते.