इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore_ संघाने बदली म्हणून आपल्या संघात तीन खेळाडूंचा समावेश केला आहे. आरसीबीने (RCB) श्रीलंकेचा अष्टपैलू वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga), दुश्मंत चमीरा (Dushmantha Chameera) आणि टिम डेविडला संघात स्थान दिले आहे. अॅडम झांपाच्या (Adam Zampa) जागी हसरंगाला संघात स्थान देण्यात आले आहे, तर फिन एलनच्या जागी टीम डेविड खेळताना दिसेल. तसेच दुश्मंत चमीरा डॅनियल सॅम्सची जागा घेईल. यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरले ते म्हणजे हसरंगा आणि चमीरा यांनी जुलै महिन्यात शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाविरुद्ध (Indian Team) टी-20 आणि वनडे मालिकेत संघासाठी जबर कामगिरी केली. दोघांनी आपल्या गोलंदाजीच्या बळावर धवन ब्रिगेडला चांगलंच नाचवले. याशिवाय लक्षात घेण्यासारखे म्हणजे आयपीएल (IPL) 2021 हंगामासाठी करण्यात आलेल्या खेळाडूंच्या लिलावात एकाही श्रीलंकन खेळाडूसाठी खरेदीदार सापडला नव्हता. पण भारताच्या श्रीलंका दौऱ्यानंतर दोन खेळाडू बदली म्हणून खेळताना दिसतील. (IPL 2021 in UAE: पंजाब किंग्सकडून नॅथन एलिस याची आयपीएलच्या रिंगणात उडी, तब्बल 22 कोटी खर्च केलेले ‘या’ 2 ऑसी खेळाडूंची दुसऱ्या टप्प्यातून एक्सिट)
वनिंदू हसरंगाने भारताविरुद्ध मालिकेत अननुभवी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले होते. टी-20 मालिकेत हसरंगाची प्लेअर ऑफ द सीरिज म्हणून निवड झाली होती. हसरंगाने तीन एकदिवसीय सामन्यात 3 आणि तीन टी-20 सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या. इतकंच नाही तर हसरंगाचा आरसीबी संघात समावेश झाल्याने आता संघाचा मुख्य भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या स्थानाला धोका निर्माण होऊ शकतो. चहल गेल्या काही काळापासून लयीत दिसत नाही आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेत देखील तो प्रभावी खेळ करण्यात अपयशी ठरला होता. शिवाय आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित होण्यापूर्वी त्याने स्पर्धेतील सर्वात महागडी ओव्हर देखील टाकली होती. त्यामुळे हसरंगाच्या उपस्थितीने चहलचे स्थान अडचणीत येते की नाही यदाकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. दुसरीकडे, इंग्लंड दौऱ्यापासून फॉर्मात असलेला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चमीराने अष्टपैलू डॅनियल सॅम्सची जागा घेतली.
आयपीएल 2021 च्या लिलावात चमीराला खरेदी करण्यात कोणत्याही फ्रँचायझीने रस दाखवला नव्हता. तो यापृवी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता आणि आता तो त्याच्या दुसऱ्या आयपीएलसाठी तो सज्ज झाला आहे. त्याने 28 टी-20 मध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामात बेंगलोर संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. संघाने 7 पैकी 5 सामने जिंकले आणि गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. आता 20 सप्टेंबर रोजी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात ते कोलकाता नाइट रायडर्सशी लढतील.