चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सलामीवीर रुतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) शनिवारी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध 101 धावांची धडाकेबाज खेळी खेळली आणि कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने आपल्या डावात नऊ चौकार आणि पाच षटकार खेचले. रुतुराजच्या या झंझावाती डावाच्या जोरावर चेन्नईने राजस्थानसमोर विजयासाठी 190 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. गायकवाडला वगळता स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजानेही 15 चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद 32 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या नाबाद शतकाने त्याने यंदा आयपीएल हंगामात 500 धावाही पूर्ण केल्या आहेत. असे करणारा तो पहिला फलंदाज आहे. यंदाच्या मोसमात त्याने तीन अर्धशतकेही केली आहेत. सलामीवीर म्हणून आलेल्या गायकवाडने खेळपट्टीवर स्थिरावल्यावर आकर्षक फटके मारले आणि चेन्नईला राजस्थानविरुद्ध सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली. (IPL 2021, RR vs CSK: शतकवीर Ruturaj Gaikwad-जडेजाच्या वादळापुढे राजस्थान गोलंदाज हतबल, चेन्नईने उभारला 189 धावांचा डोंगर)
गायकवाडने पहिले 43 चेंडूत अर्धशतक केले. यानंतर, त्याने धावगतीचा वेग वाढवला आणि त्यानंतर, गियर बदलत त्याने पुढच्या 17 चेंडूत अर्धशतकाचे शतकात रूपांतर केले. विशेष म्हणजे मुस्तफिझूर रहमानच्या शेवटच्या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी तो 95 धावांवर खेळत होता. या षटकात जडेजाने पहिले चार चेंडू खेळले. पाचव्या चेंडूवर गायकवाडला एकही धाव मिळाली नाही आणि गायकवाडला आता शतकासाठी शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती. त्यामुळे त्याने अपेक्षेप्रमाणे तसेच केले. त्याने आपले पहिले आयपीएल शतक 60 चेंडूत शानदार षटकारासह पूर्ण केले. गायकवाडने 60 चेंडूत 101 धावा केल्या. त्याच्या डावात 5 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. रुतुराज गायकवाडच्या शानदार शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकांत 4 गडी गमावून 189 धावा केल्या.
Century with a 6. Elite innings from Ruturaj Gaikwad💎🔥#IPL2021 #CSKvsRR #RRvsCSKpic.twitter.com/EMVPk0aBRu
— Ryan (new account) (@ryandesa_07) October 2, 2021
इतकंच नाही तर CSK साठी सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये शतक झळकावण्याचाही कारनामा गायकवाडने केला. त्याने 24 वर्षे 244 दिवसांत या संघासाठी हा पराक्रम केला. तसेच चेन्नईसाठी आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो नववा फलंदाज ठरला असून यंदाच्या लीगमध्ये राजस्थानविरुद्ध शतक झळकावणारा तो सातवा फलंदाज ठरला. सीएसकेसाठी राजस्थानविरुद्ध मुरली विजयने 2010 आणि 2018 मध्ये शेन वॉटसनने शतक ठोकले होते.