IPL 2021, RR vs CSK: अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) पहिले फलंदाजी करून युवा सलामीवीर रुतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) ताबडतोड शतकाच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 189 धावांचा डोंगर उभारला आहे. गायकवाड 60 चेंडूत 101 धावा करून नाबाद परतला. गायकवाडने आपल्या खेळीत 9 चौकार व 5 उत्तुंग षटकार खेचले. रुतुराजला वगळता रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 15 चेंडूंत नाबाद 32 धावा केल्या. आजच्या सामन्यात रुतुराज आणि जडेजाच्या वादळी खेळीपुढे राजस्थानचे गोलंदाज हतबल दिसले. राजस्थानसाठी राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)