IPL 2021: एमएस धोनीला मिळाली रॉबिन उथप्पाची साथ, CSK आणि राजस्थान रॉयल्समध्ये झाली ट्रेडिंग
रॉबिन उथप्पा (Photo Credits: Instagram/Robin Uthappa)

IPL 2021: आयपीएल 2020 मध्ये बॅटने काही कमाल न करू शकलेल्या रॉबिन उथप्पाची (Robin Uthappa) चेन्नई सुपर किंग्ज संघाने (Chennai Super Kings) राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) ट्रेडिंग केली आहे. म्हणजेच उथप्पा आता चेन्नईच्या 'येलो आर्मी'कडून खेळताना दिसेल. गेल्या हंगामात उथाप्पा राजस्थान संघाचा भाग होता, परंतु बॅटने काहीच कमाल दाखवू शकला नाही. 2019 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने रिलीज केल्यावर इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) शेवटचे दोन सत्र उथप्पासाठी चांगले नव्हते. रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केल्यावर सीएसकेने उथप्पाची राजस्थान फ्रँचायझीसह ट्रेडिंग केली आहे. यानंतर उथप्पाला संघात सामील केल्यानंतर, सीएसकेला (CSK) परदेशी खेळाडूंसह आणखी सहा खेळाडू खरेदी करू शकतात. विशेष म्हणजे गेल्या वर्षी राजस्थानने उथप्पाला तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. आयपीएल 2020 मध्ये या विकेटकीपर-फलंदाजाने 12 सामन्यात केवळ 196 धावा केल्या. लिलावापूर्वी चेन्नईने आपल्या सहा खेळाडूंना रिलीज केले आहे, ज्यात हरभजन सिंह आणि केदार जाधव यांच्यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. (CSK Squad for IPL 2021: चैन्नई सुपर किंग्स कडून ऑक्शनसाठी खेळाडूंची नावे जाहीर, जाणून घ्या कोणाला दिला गेला डच्चू)

उथप्पाने आयपीएल 2019 मध्ये कोलकाताकडून खेळत 115.1 च्या स्ट्राईक रेटने 282 धावा केल्या. तथापि, उथप्पा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा 2021 मध्ये आतापर्यंत सलामी फलंदाज म्हणून त्याने चांगला फॉर्म दाखवला आहे. राजस्थान रॉयल्सने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात उथप्पाने म्हटले की, "मी माझे वर्ष रॉयल्ससाठी खूप एन्जॉय केले आणि टीमबरोबर मी चांगला वेळ घालवला. आयपीएल 2021 साठी चेन्नई सुपर किंग्जकडून माझा नवीन क्रिकेट प्रवास सुरू करण्यास मी खूप उत्सुक आहे." यापूर्वी चेन्नईकडे 22.9 कोटी रुपये उरले होते, परंतु सीएसकेने राजस्थानबरोबर उथप्पाची (3 कोटी) ट्रेडिंग केल्यानंतर आता त्यांच्याकडे 19.9 कोटी रुपये शिल्लक आहेत.

सुपर किंग्जने आपले दोन सलामीवीर शेन वॉटसन आणि मुरली विजय यंदा रिलीज केले आहेत. चेन्नईत फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू, रुतुराज गायकवाड एन जगदीशन असे सलामी फलंदाज म्हणून खेळणारे फलंदाज आहेत मात्र उथप्पाचा ओपनर म्हणून अनुभव संघाच्या कामी येऊ शकतो. दुसरीकडे, रॉयल्सने आयपीएल 2021 साठी संजू सॅमसनला आपला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त करत स्टीव्ह स्मिथला बाहेरचा रास्ता दाखवला आहे.