यंदाच्या वर्षअखेरीस होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (Board of Control for Cricket in India) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी गुरुवारी सांगितले. यावर्षी स्पर्धेचे उर्वरित सामने पूर्ण न झाल्यास मंडळाला मोठा नुकसान होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयपीएल (IPL) 2021 यंदा भारतातील सहा शहरात बायो-बबलमध्ये खेळला जात होता, परंतु अहमदाबाद आणि दिल्लीमध्ये या आठवड्याच्या सुरूवातीला बबलचे उल्लंघन करण्यात आले. 4 खेळाडू (केकेआरचे 2, हैदराबाद व दिल्लीचे प्रत्येकी 1), चेन्नई सुपर किंग्जचे 2 सहाय्यक कर्मचारी आणि एक बस क्लीनर 3 आणि 4 मे रोजी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले ज्याने अखेरीस बीसीसीआयला (BCCI) स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यास भाग पाडले. आयपीएल 2021 मध्ये 3 मे पर्यंत फक्त 29 सामने खेळले गेले तर स्पर्धेचा अंतिम सामना 30 मे रोजी खेळणे अपेक्षित होते. (IPL 2021 स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनचा खेळाडूंना सतर्कतेचा इशारा, म्हणाले- ‘COVID-19 काळात परदेशी टी-20 लीग खेळण्यापूर्वी...’)
गांगुली म्हणाले की, आयपीएल 2021 चा उर्वरित हंगाम पूर्ण करण्यासाठी बोर्ड टी-20 वर्ल्ड कप पूर्वीच्या विंडोकडे पाहत आहे. याशिवाय त्यांनी पुढे म्हटले की यंदा आयपीएल पूर्ण न झाल्यास बोर्डाला तब्बल 2,500 कोटी रुपयांचं नुकसान होईल. “तिथे खूप बदल झाले आहेत. आम्ही आयपीएलला स्थगित केल्यापासून फक्त एक दिवस झाला आहे. आम्हाला इतर मंडळांशी बोलावे लागेल आणि टी -20 वर्ल्ड कपपूर्वी विंडो उपलब्ध करुन दिली जाऊ शकते का ते पहावे लागेल,” गांगुलीने द टेलीग्राफला सांगितले. “बर्याच गोष्टींचा यात सहभाग आहे आणि आम्ही हळूहळू त्यावर कार्य करण्यास सुरवात करू. जर आम्ही आयपीएल पूर्ण करण्यात अपयशी ठरलो तर तोटा 2500 कोटी रुपयाच्या (अंदाजे 340 लाख डॉलर्स) जवळपास होईल. सुरुवातीच्या अंदाजानुसार हे घडत आहे,” ते पुढे म्हणाले.
दरम्यान, मागील वर्षी, महामारीच्या काळात आयपीएलचा संपूर्ण हंगाम युएईमध्ये सहजतेने पार पडला आणि उर्वरित आयपीएल 2021 सामने पूर्ण करण्यासाठी बीसीसीआय यंदाही पुन्हा एकदा त्याच मार्गावर जाईल असे दिसत आहे. इंग्लंडमधील काउंटीच्या गटानेही आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामात आयोजित करण्यात रस दर्शविला आहे आणि बीसीसीआयकडे आपला प्रस्ताव पाठवण्यासाठी ईसीबीला पत्र लिहिलं असल्याचं समजलं जात आहे पण अद्याप यावर कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही आहे.