कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

आयपीएल (IPL) 2021 प्लेऑफ सामने रविवारपासून सुरू झाले आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या केकेआर (KKR) संघाला रॉय चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध एलिमिनेटर (IPL Eliminator) सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू शकिब अल हसनने (Shakib al Hasan) महत्त्वपूर्ण प्लेऑफ सामन्यांपूर्वी संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआर संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत संघाला आरसीबी (RCB) विरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागेल. जर त्यांनी हा सामना जिंकला, तर त्यांना दुसरा क्वालिफायर सामना खेळूनच अंतिम फेरीत स्थान मिळवता येईल. प्लेऑफमध्ये पोहोचणारे चार संघ खूप मजबूत आहेत, त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) त्यांचा सर्वोत्तम खेळ दाखवण्याची गरज आहे. तथापि, ती शाकिब अल हसनच्या अनुपस्थितीत या सामन्यांमध्ये केकेआरला नक्कीच जाणवेल. शाकिबच्या या निर्णयामागे टी-20 विश्वचषक स्पर्धा मुख्य कारण आहे.

आयपीएलनंतर आयसीसी संयुक्त अरब अमिरातीमध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी संघांनी यूएईला पोहोचणेही सुरू केले आहे.अहवालानुसार, रविवारी यूएईला पोहोचणाऱ्या आयपीएलपेक्षा टी-20 विश्वचषकाला प्राधान्य देत प्लेऑफपूर्वी शाकिबने बांगलादेशमध्ये त्याच्या राष्ट्रीय संघात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राजस्थान रॉयल्सचा मुस्तफिजुर रहमानही बांगलादेश संघात सामील होईल. मात्र राजस्थान प्लेऑफमध्ये नसल्याने त्यांच्यासाठी हा धक्कादायक निर्णय नाही आहे. 12 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यापूर्वी बांगलादेश संघाला सराव सत्राची संधी मिळणार नाही. संघ रविवारी येथे पोहोचेल आणि सोमवारपर्यंत ते क्वारंटाईन राहतील. संघ 15 ऑक्टोबर रोजी आयर्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे.

दरम्यान, आयपीएलच्या सध्याच्या मोसमात शाकिबला मैदानात उतरण्याची फारशी संधी मिळाली नाही. त्याने फक्त पाच सामने खेळले आहेत ज्यात त्याने फक्त 4 विकेट्स घेतल्या आहेत आणि 38 धावा केल्या आहेत. शाकिबने 2011 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स कडून आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 2018 मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघात सामील झाला. 2021 मध्ये तो पुन्हा कोलकाता नाईट रायडर्स ताफ्यात परतला. एकूणच शाकिबने आतापर्यंत 63 आयपीएल खेळले आहेत, ज्यात त्याने 126.66 च्या स्ट्राईक रेटने 746 धावा केल्या आहेत. यासह, त्याने 7.46 च्या इकॉनॉमी रेटने 59 विकेट्स घेतल्या आहेत.