IPL 2021, RCB vs KKR Eliminator: सुनील नारायणने मोडलं RCB चं कंबरडं, KKR साठी IPL प्लेऑफमधील सर्वात मोठा विक्रम केला आपल्या नावे
सुनील नारायण (Photo Credit: PTI)

IPL 2021, RCB vs KKR Eliminator: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या एलिमिनेटर सामन्यात केकेआरचा (KKR) फिरकी गोलंदाज सुनील नारायणने (Sunil Narine) अत्यंत घातक गोलंदाजी करत विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबी (RCB) संघाचे कंबरडे मोडले. नारायणने या सामन्यात आरसीबीच्या सर्वोत्तम फलंदाजांना बाद केले आणि यामुळे हा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. केकेआरच्या या घातक गोलंदाजाने आपल्या घातक गोलंदाजीच्या बळावर या लीगमध्ये केकेआरसाठी एक विक्रम केला जो यापूर्वी कोणालाही करता आला नव्हता. कोलकाता नाईट रायडर्सच्या फिरकीपटूने ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या (AB de Villiers) मोठ्या विकेट्स उचलून आरसीबी बॅटिंग युनिटला गुदगे टेकण्यास भाग पाडले ज्यामुळे संघ 20 षटकांत 138/7 धावांपर्यंतच मजल मारू शकला. नारायणने चार षटकांत 4/21 ची आकडेवारीची नोंद केली. (IPL 2021, RCB vs KKR Eliminator: सुनील नारायणच्या फिरकीपुढे आरसीबी धुरंधर ढेर, कोलकाताला दिले 139 धावांचे आव्हान)

अशाप्रकारे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात त्याने कोहलीला 39 धावा, एस भरतला 9 धावा, ग्लेन मॅक्सवेलला 15 धावांवर आणि एबी डिव्हिलियर्सला 11 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. या चार फलंदाजांना बाद केल्यामुळे आरसीबीची चांगलीच नाचक्की झाली. नारायणने या सामन्यात चार विकेट्स घेतल्या आणि आयपीएल प्लेऑफमध्ये चार विकेट घेणारा कोलकाताचा पहिला गोलंदाज ठरला. त्याच्या गोलंदाजीचे कौतुक जितके करावे तितके कमी आहे कारण विराट, कोहली आणि एबी सारख्या फलंदाजांना एकत्र बाद करणे सोपे नाही. याशिवाय तो आयपीएल प्लेऑफमध्ये केकेआरसाठी सर्वोत्तम गोलंदाजही बनला आणि त्याने उमेश यादवचा विक्रम मोडला. यापूर्वी यादवने केकेआरसाठी आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला होता. उमेशने 2014 मध्ये पंजाबविरुद्ध 13 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या. सोबतच नारायण स्पर्धेत एकाच फ्रँचायझीच्या विरोधात तीन वेळा चार विकेट घेणारा पहिला स्पिनर ठरला.

नारायणने आयपीएलमध्ये 4 विकेट्स घेण्याचीही आठवी वेळ ठरली. सोमवारपूर्वी, त्याने 2013 आणि 2014 मध्ये RCB विरुद्ध 4 विकेट्स घेतल्या होत्या. 2013 मध्ये त्याने रांचीमध्ये बेंगलोरविरुद्ध 4/22 घेतल्या आणि 2014 मध्ये कोलकातामध्ये घरच्या मैदानावर त्याच संघाविरुद्ध 4/20 विकेट घेतल्या होत्या. त्याने या बाबतीत लिसिथ मलिंगा का रिकार्ड तोडला. मलिंगा ने आयपीएलमध्ये एकूण 7 वेळा एका सामन्यात चार विकेट घेतल्या होत्या.