IPL 2021, RCB vs KKR Eliminator: सुनील नारायणच्या फिरकीपुढे आरसीबी धुरंधर ढेर, कोलकाताला दिले 139 धावांचे आव्हान

आयपीएल 2021 च्या एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीचे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 138 धावाच करू शकली. अशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्सना विजयासाठी 139 धावांचे माफक टार्गेट मिळाले आहे. आरसीबीसाठी विराट कोहलीने सर्वाधिक 39 धावा केल्या. तसेच केकेआरसाठी सुनील नारायण 4 विकेट घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

IPL 2021, RCB vs KKR Eliminator: सुनील नारायणच्या फिरकीपुढे आरसीबी धुरंधर ढेर, कोलकाताला दिले 139 धावांचे आव्हान
कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: Twitter/IPL)

आयपीएल 2021 च्या एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीचे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 138 धावाच करू शकली. अशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्सना (Kolkata Knight Riders) विजयासाठी 139 धावांचे माफक टार्गेट मिळाले आहे. आरसीबीसाठी (RCB) विराट कोहलीने सर्वाधिक 39 धावा केल्या. तर देवदत्त पडिक्क्लने 21 धावांचे योगदान दिले. तसेच केकेआरसाठी सुनील नारायण (Sunil Narine) 4 विकेट घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने विराटसह श्रीकर भरत, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल या आरसीबी धुरंधर फलंदाजांना माघारी धाडले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2021 09:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).