IPL 2021: मुंबई इंडियन्स संघतील क्रिकेटपटूंची नावे घेत पायलटची कल्पक उद्घोषणा, ऐकणारे अवाक (Watch Video)
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

गतविजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यूएई (UAE) येथे दाखल झाला आहे आणि इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 पुन्हा सुरू होण्याआधीच त्यांची तयारी सुरू करू पाहत आहेत. यंदा वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यात कोविड-19 महामारीमुळे स्थगित करण्यात आलेले आयपीएलचा (IPL) दुसरा टप्पा यूएईमध्ये 17 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्स संघ शुक्रवार, 13 ऑगस्ट रोजी मुंबईवरून अबू धाबीला रवाना झाले. यादरम्यान पायलटने कल्पक उद्घोषणा करत खेळाडूंना चकित केले. पायलटने मुंबई इंडियन्स खेळाडूंचे संदर्भ वापरून, विमानात टीमचे स्वागत केले आणि काही स्टाईलमध्ये ATC सूचना दिल्या. (IPL 2021: ECB-CA च्या ‘या’ निर्णयामुळे केवळ BCCI च नव्हे तर सर्व आयपीएल संघांना मिळणार दिलासा)

“विमानात तुमचे स्वागत करणे हा एक सन्मान आहे. आज सकाळी येणारा पाऊस लक्षात घेता, रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी संघासाठी केले, त्याप्रमाणे आम्ही झटपट सुरुवात केली,” पायलटने म्हटले. यानंतर त्याने किरोन पोलार्ड, इशान किशन, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह घोषणांमध्ये इतरांचाही उल्लेख केला. दरम्यान, मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव सारख्या आघाडीच्या खेळाडूंशिवाय अबू धाबीमध्ये त्यांचे प्रशिक्षण शिबिर सुरु करेल. रोहित, बुमराह आणि सूर्यकुमार सध्या भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी ब्रिटन दौऱ्यावर आहे. अनेक परदेशी खेळाडू देखील त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्यांमुळे नंतर संघात सामील होतील. मुंबई इंडियन्सचे खेळाडू आपले प्रशिक्षण शिबीर सुरू करण्यापूर्वी काही दिवस अबू धाबीमध्ये क्वारंटाईन राहतील.

आयपीएल 2021 मध्ये, मुंबई इंडियन्सचे सध्या सात सामन्यांत 8 गुण आहेत आणि ते टेबलवर चौथ्या क्रमांकावर आहेत. 19 सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी, चेन्नई सुपर किंग्स विरोधात मुंबई आपल्या मोहिमेची सुरुवात करतील. मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई सर्वाधिक पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत. आता युएई येथे सलग तिसरे तर एकूण सहावे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे.