IPL 2021 Orange Cap Updated: KL Rahul ला ओव्हरटेक करत Shikhar Dhawan ने पुन्हा पटकावली ऑरेंज कॅप; पहा टॉप-5 मध्ये कोणाचा समावेश
आयपीएल 2021 ऑरेंज कॅप (Photo Credit: File Image)

IPL 2021 Orange Cap List Updated: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) सलामीवीर फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) रविवारी पंजाब किंग्जविरुद्ध  (Punjab Kings) खेळताना आपला शानदार फॉर्म कायम ठेवला. केएल राहुलच्या (KL Rahul) अनुपस्थितीत धवनने आयपीएल 2021 च्या ऑरेंज कॅपवर पुन्हा एकदा आपले नाव लिहिले. राहुलला पछाडण्यासाठी धवनला 23 धावांची गरज होती आणि दिल्लीच्या फलंदाजाने ते स्टाईलमध्ये ऑरेंज कॅप काबीज केली. शिखर धवन हा आयपीएल (IPL) 2021 मधील सर्वात सुसंगत फलंदाज आहे. याशिवाय, धवनचा सलामी साथीदार पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) पाचव्या क्रमांकावर ताबा मिळवला आहे. पंजाब किंग्सचा प्रभारी कर्णधार मयंक अग्रवाल सहाव्या स्थानावर पोहचला आहे.  (IPL 2021 Orange Cap List Updated: आयपीएल 2021 मध्ये ऑरेंज कॅप शर्यतीत सहभागी खेळाडूंची यादी पहा )

2008 मध्ये ऑरेंज कॅपवर ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्शने कब्जा केला होता. त्याने किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत 616 धावा केल्या. यानंतर 2009मध्ये मॅथ्यू हेडन, 2010मध्ये सचिन तेंडुलकर, तर 2011 आणि 12मध्ये क्रिस गेल यांनी हा सन्मान पटकावला. 2013 मध्ये माइकल हसी, 2014 मध्ये रॉबिन उथप्पा, 2015 मध्ये वॉर्नर, 2016 मध्ये विराट कोहली, 2017 मध्ये पुन्हा वॉर्नर, 2018 मध्ये केन विल्यमसन आणि 2019मध्ये पुन्हा वॉर्नर ऑरेंज कॅप मिळवण्यात यशस्वी ठरला. यानंतर, 2020 मध्ये केएल राहुलच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली होती.

आयपीएल 14 ऑरेंज कॅप खेळाडूंची यादी

दरम्यान, आयपीएल 2021 चा पहिला सामना गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबी संघाने रोमांचक सामन्यात मुंबईला दोन विकेटने पराभूत करत हंगामाची विजयी सुरूवात केली

क्रमवारी प्लेअर संघ सामने खेळले धावा
1 शिखर धवन  दिल्ली कॅपिटल्स 8 380
2 केएल राहुल पंजाब किंग्स 7 331
3 फाफ डु प्लेसिस चेन्नई सुपर किंग्स 7 320
4 पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्स 8 308
5 संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स 7 277

जर आपण दरवर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांविषयी चर्चा केली तर त्यात विदेशी खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 13 हंगाम खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चार वेळा भारतीय खेळाडूंनी ऑरेंज कॅप (IPL Orange Cap) काबीज केली आहे, तर नऊ वेळा परदेशी खेळाडूंच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात आजवर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) सर्वाधिक ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले आहे.