रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Getty)

IPL 2021: एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) ‘येलो आर्मी’ सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2021 मोसमात शानदार फॉर्ममध्ये आहे. युएईमध्ये आयपीएल (IPL) 2020 मध्ये पहिल्यांदा प्ले ऑफ गाठण्यात अपयशी ठरलेला चेन्नई संघ सध्या अंतिम-4 च्या शर्यतीत आघाडीवर आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सलग पाच विजयानंतर चेन्नईची मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) आहे. आयपीएलचा El Clasico म्हणून ओळखला जाणारा मुंबई-चेन्नई सामन्याची प्रत्येकी वर्षी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सीएसके-मुंबई हे आयपीएलमध्ये 30 आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2 वेळा भिडले आहेत. इतकंच नाही तर मुंबईने सर्वाधिक वेळा चेन्नईवर मात केली आहे आणि आता पुन्हा या आयपीएल विजेत्या संघात महामुकाबला होणार आहे. दरम्यान, चेन्नईला आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा पराभवाची चव चाखणाऱ्या संघांची यादी. (MI vs CSK Preview: आयपीएल 2021 हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या 27 व्या सामन्याबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहिती आहे काय?)

1. मुंबई इंडियन्स

धोनीच्या सुपर किंग्सना आयपीएलच्या 13 वर्षात सर्वाधिक वेळा पराभूत करण्याचा मान पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सने मिळवला आहे. मुंबई-चेन्नई आजवर आयपीएलच्या 32 सामन्यात आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबईने 19 सामन्यात चेन्नईवर मात केली असून सीएसकेने 13 सामन्यात विजय मिळवला आहे.

2. दिल्ली, राजस्थान व बेंगलोर 

चेन्नईला आयपीएलमध्ये पराभूत करणाऱ्या या यादीत दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ बरोबरीत आहेत. या तीनही संघांनी चेन्नईवर प्रत्येकी 9 सामन्यात मात केली आहे.

3. कोलकाता आणि पंजाब

कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्सने देखील चेन्नईला पराभूत करण्याचं सुख भोगलं आहे. कोलकाताने मागील 13 वर्षात 23 पैकी 8 सामन्यात सीएसकेवर वर्चस्व गाजवलं आहे तर पंजाबने 24 पैकी सीएसके विरोधात 8 सामन्यात विजय मिळवला आहे.

आयपीएलच्या 14 व्या सीजनच्या सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवानंतर चेन्नईची विजयी एक्सप्रेस वेगाने धावत आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यातील पराभव मागे टाकत सीएसकेने पंजाब, राजस्थान, कोलकाता, बेंगलोर आणि हैदराबाद संघावर मात केली आहे. आणि आता गतविजेता मुंबई इंडियन्स संघ त्यांच्या रडारवर असेल. मुंबईने पहिल्या सहापैकी तीन सामने जिंकले आहेत व ते पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. परंतु राजस्थान रॉयल्सला (आरआर) 7 गडी राखून पराभूत केल्यानंतर त्यांना विजयपथावर परतण्याचा मार्ग सापडला आहे. आणखी एक विजय मुंबई संघाला चौथ्या क्रमांकावर आपली पकड घट्ट करण्यास मदत करेल तर चेन्नईला पहिल्या क्रमांकावरील आपले राज्य कायम ठेवण्यासाठी विजय गरजेचा असेल.