दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आज इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे. त्यापूर्वी दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांनी रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ आयपीएल (IPL) 2021 चे विजेतेपद पटकावू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनल खेळण्यासाठी दिल्ली बॉईज कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध बुधवारी शारजाह (Sharjah) येथे Qualifier-2 मध्ये भिडणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2021 मध्ये नाविन्यपूर्ण क्रिकेट खेळले आहे आणि लीग स्टेज टेबल-टॉपर्स राहिले परंतु पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झाल्यावर ते त्यांच्या पहिल्या मोठ्या टेस्टमध्ये अपयशी ठरले. यादरम्यान, पाँटिंगने निदर्शनास आणून दिले की, दिल्लीने प्लेऑफ गाठण्यासाठी गेल्या दोन वर्षांमध्ये सातत्याने चांगले खेळले आहे आणि एका टीमला त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार खेळण्यासाठी सर्व अकरा खेळाडूंना प्रभाव पाडणे आवश्यक आहे. (Delhi Capitals IPL 2021 Qualifier 2 Likely Playing XI: क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटल्स मोठा निर्णय घेणार? ‘या’ 11 खेळाडूंसह केकेआरशी भिडणार)
“मी तीन वर्षांपासून दिल्लीत आहे. पहिल्या वर्ष मी येथे होतो, तेव्हा आम्ही शेवटचे राहिलो होती. दोन वर्षांपूर्वी आम्ही तिसरे आणि गेल्या वर्षी आम्ही दुसरे स्थान मिळवले. मला वाटते की आम्ही आयपीएल जिंकू शकतो. तुम्हाला माहिती आहे, मी कदाचित असे म्हणत रेकॉर्डवर चांगले जाऊ शकतो कारण मी इथे आहे. याचसाठी खेळाडू येथे आहेत,” रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले. “हे दोन वर्षापूर्वीपेक्षा वेगळी दिल्ली आहे. आणि याचे कारण असे आहे की तुम्ही लोकांनी या फ्रँचायझीत एक वेगळीच ताकद आणली आहे. एका महान संघाचे लक्षण हे आहे की केवळ एक किंवा दोन खेळाडूच चांगली कामगिरी करत नाहीत, तर सर्व 11 खेळाडू गरज पडल्यावर स्वतःचे योगदान देतात,” पाँटिंग पुढे म्हणाले.
🎥 | The only way to prep yourself ahead of a crunch game 👉🏼 Listen to Punter 🤩
Time for a spectacle in Sharjah. Bring it on 🔥#YehHaiNayiDilli #IPL2021 #DCvKKR pic.twitter.com/FBJKgha024
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 13, 2021
आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने चमकदार कामगिरी केली आहे. 10 सामने जिंकून त्यांनी गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला होता. आयपीएल 2021 चा दुसरा क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या शारजाह क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 पासून खेळला जाईल. दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना अपेक्षित आहे.