IPL 2021: चर्चा तर होणारच! या 3 अनकॅप्ड खेळाडूंनी 14व्या मोसमात आतापर्यंत केली सर्वोत्कृष्ट कामगिरी
हर्षल पटेल (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा थरार सुरु झाला आहे आणि दरवर्षीप्रमाणे प्रत्येक खेळाडू आपले सर्वोत्तम प्रदर्शन करत आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यातील सलामीच्या रंगतदार सामन्याने आयपीएलची चांगली सुरुवात झाली. आतापर्यंत एकूण 18 सामने खेळले गेले असून फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये ऑरेंज व पर्पल कॅपसाठी जोरदार चुरस रंगली आहे. मागील 13 मसीमाप्रमाणे यंदाही सुरुवातीच्या काही सामन्यात आंतराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या साथीला नवोदित युवा खेळाडू देखील प्रभाव पाडण्यात यशस्वी झाले आहे. यामध्ये अनकॅप्ड खेळाडूंनी (Uncapped Players) अधिकप्रमाणत चाहते व जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज या लेखात आपण अशाच अनकॅप्ड खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. (IPL: ‘या’ 5 भारतीय गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक नो बॉल, पहिले नाव जाणून बसेल धक्का)

1. हर्षल पटेल (Harshal Patel)

सध्याच्या आयपीएलचा पर्पल कॅपचा मानकरी आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल या यादीत आघाडीवर आहे. मुंबई इंडियन्स विरोधात सामन्यात पटेलने शानदार सुरुवात केली आणि गेतविजेत्या संघाविरुद्ध आयपीएलमध्ये 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला. यानंतर हर्षलची गाडी इथेच थांबली नाही आणि प्रत्येक सामन्यात तो संघाला गरज असताना विकेट घेण्यात यशस्वी झाला आहे. हर्षलने आतापर्यंत 4 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत.

2. देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal)

आरसीबीचा देवदत्त पडिक्क्ल देखील या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. कोविड मुळे पहिल्या सामन्याला मुकणाऱ्या, त्यांनतर पुढील दोन सामन्यात संघर्ष केल्यावर पडिक्क्लने राजस्थान विरोधात दणदणीत शतक ठोकले. देवदत्त अद्याप ऑरेंज कॅपपासून दूर असला तरी त्याने 3 सामन्यात 137 धावा केल्या आहेत. शिवाय, पडिक्क्ल आपल्या फिल्डिंगने देखील संघात मोठे योगदान दिले आहे.

3. चेतन सकारिया (Chetan Sakariya)

सौराष्ट्रच्या या युवा फिरकीपटूने आपल्या पहिल्या आयपीएल मोसमात प्रभावी कामगिरी बजावली आहे. राजस्थान रॉयल्ससाठी सकारियाने 5 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. सध्या आयपीएलच्या पर्पल कॅपच्या शर्यतीत तो सहाव्या स्थानावर आहे आणि काळात तो अधिक विकेट घेत संघासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.