IPL: ‘या’ 5 भारतीय गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक नो बॉल, पहिले नाव जाणून बसेल धक्का
जसप्रीत बुमराह (Photo Credit: Instagram/mumbaiindians)

IPL: इंडियन प्रीमियर लीग 2021 (Indian Premier League 2021) चा थरार हळूहळू लोकांवर चढू लागला आहे. कोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे यंदाचे आयपीएल (IPL) भारतात खेळवण्यात आले असले तरी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी मिळाली नाही आहे. शिवाय, मोजक्याच ठिकाणी बायो-बबलमध्ये सामन्यांचे आयोजन करण्यात येत आहे. आयपीएलच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यातील थरार अनुभवायला मिळत आहे. आयपीएलच्या 13 वर्षाच्या इतिहासात आजवर असे अनेक विक्रम असे झाले आहेत की जे जाणून तुम्ही हैराण व्हाल. तर काही विक्रम असे आहेत जे कोणत्याच खेळाडूला आपल्या नावावर असू नयेत असे वाटले. आयपीएलमधील असाच एक नकोसा वाटणारा विक्रम म्हणजे सर्वाधिक नो बॉल (Most No Balls in IPL) टाकण्याचा आहे. जाणून घेऊयात कोणत्या गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक नो बॉल टाकले आहेत. (IPL 2021: 'या' खेळाडूमुळे मुंबई इंडियन्सला पराभूत करणे थोडे कठीण- वीरेंद्र सेहवाग)

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

आयपीएलमध्ये सर्वाधिक नो-बॉल टाकण्याचा विक्रम भारतीय वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा प्रमुख सदस्य असणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. देशाच्या या प्रतिष्ठित स्पर्धेत बुमराहने आतापर्यंत 25 नो-बॉल टाकले आहेत.

एस. श्रीसंत (S. Sreesanth)

आयपीएलमध्ये बंदी येण्यापूर्वी 38 वर्षीय एस.श्रीसंतचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीसंतने आयपीएल 2008 पापडून 2013 दरम्यान 44 सामन्यात 23 नो बॉल टाकले आहेत.

इशांत शर्मा (Ishant Sharma)

दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज 32 वर्षीय इशांत या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. शर्मा आयपीएलमध्ये 90 सामन्यात 21नो बॉल टाकण्याच्या विक्रमाची नोंद केली आहे.

अमित मिश्रा (Amit Mishra)

दिल्लीचा सध्याचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राचे नाव या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. मिश्राने आयपीएलच्या 152 सामन्यात 23.9 च्या सरासरीने 164 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याने 21 नो बॉल देखील टाकले आहेत.

उमेश यादव (Umesh Yadav)

या यादीतील पाचवे मोठे नाव भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान दिग्गज वेगवान गोलंदाज उमेश यादवचे आहे. उमेश यादवने आयपीएलमध्ये आतापर्यंत 19 नो-बॉल टाकले आहेत.