केदार जाधव (Photo Credit: Instagram)

सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) मधल्या फळीचा फलंदाज केदार जाधव  (Kedar Jadhav) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मधील त्याच्या कामगिरीने अजिबात प्रभावित करू शकला नाही. जाधवने आयपीएल (IPL) 2021 मध्ये पाच सामने खेळले असून त्याने फक्त 43 धावा केल्या आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचकाची भूमिका बजावणाऱ्या आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी केदारबाबत मत व्यक्त करत म्हटले की सनरायझर्स हैदराबादचा शनिवारी पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध सामना केदार जाधवसाठी स्पर्धेतील शेवटचा सामना ठरू शकतो. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या जवळपास बाहेर पडलेल्या सनरायझर्स हैदराबादला आता पुढच्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना करावा लागणार आहे. जाधव यंदा हंगामात त्याच्या बॅटने अजिबात कामगिरी करू शकला नाहीत आणि संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. (IPL 2021: टी नटराजनची शॉर्ट-टर्म COVID-19 बदली म्हणून SRH ने जम्मू-काश्मीरच्या ‘या’ युवा खेळाडूचा केला समावेश)

चोप्रा म्हणाले की, केदार जाधवची जागा भरण्यासाठी सनरायझर्स हैदराबादकडे बेंचवर फारसे पर्याय नाही, परंतु अजूनही त्यांनी बदलाची अपेक्षा व्यक्त केली आहे. आकाश आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाले, “हा जाधवचा शेवटचा सामना असू शकतो. जर तुम्हाला त्याच्याऐवजी दुसरे कोणी खेळायचे द्यायचे असेल तर ते अभिषेक शर्मा किंवा प्रियम गर्ग असू शकतात. पण संघात बरेच बदल शक्य नाहीत.” आकाशने केएल राहुलच्या नेतृत्वातील पंजाब संघाबद्दलही येथे सांगितले. ते म्हणाले की, “पंजाबला किमान काही बदल करणे आवश्यक आहे आणि ते परदेशी खेळाडूंमध्ये असले पाहिजे.” त्यांनी म्हटले, “आदिल रशीद आणि फॅबियन एलनच्या जागी क्रिस गेल आणि नॅथन एलिसला संधी मिळाली पाहिजे. गेल नक्कीच टी-20 क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक आहे आणि अॅलिसने शेवटच्या षटकात चमकदार गोलंदाजी करून आपला ठसा उमटवला आहे. याशिवाय, मुरुगन अश्विन किंवा रवी बिष्णोई चांगली प्लेइंग इलेव्हन बनवू शकतो.”

दरम्यान, पॉइंट टेबलबाबत बोलायचे झाले तर दोन्ही संघ तळाशी विराजमान आहेत. हैदराबादने आठ पैकी सात सामने गमावले आहेत आणि संघ 2 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. तर पंजाब 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.