IPL 2021, DC vs CSK Qualifier 1: एमएस धोनीवर भारी पडणार रिषभ पंतचे दिल्ली बॉईज, ‘या’ ताकदीमुळे फायनलमध्ये मिळणार एंट्री
चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेचा पहिला प्लेऑफ आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) - चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात रंगणार आहे. या दोन्ही संघांमध्ये समान ताकदीचा असेल आणि त्यांनी इतर सर्व संघांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पण या दरम्यान एका दिग्गजाने दिल्लीचे वर्णन अधिक शक्तिशाली असे केले आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल क्वालिफायर 1 (IPL Qualifer 1) पूर्वी वेस्ट इंडिजचे महान खेळाडू ब्रायन लारा (Brian Lara) यांनी रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वातील संघाच्या गोलंदाजी हल्ल्याची प्रशंसा केली आणि म्हटले की ते सीएसके (CSK) संघाला भारी पडू शकतात. तथापि, त्यांनी सावध केले की अधिक अनुभवी एमएस धोनीच्या नेतृत्वातील सुपर किंग्स संघाकडे फलंदाजीमध्ये गहनता आहे आणि कोणत्याही दिवशी समोरच्या संघावर मोठा परिणाम होऊ शकतो. (IPL 2021, DC vs CSK Qualifier 1: पहिला क्वालिफायर खेळताच रिषभ पंत-MS Dhoni यांच्या नावे होणार मोठ्या विक्रमाची नोंद, IPL मध्ये घडणार इतिहास)

लाराने क्रिकेट डॉट कॉमला सांगितले, “ज्या चार संघांनी सर्वोत्तम क्रिकेट खेळले ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी पात्र आहेत. मी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यासाठी उत्सुक आहे. हे रोमांचक असणार आहे. हा एक महत्त्वाचा सामना आहे पण संघांना वाटले की जर त्यांची संधी हुकली तर त्यांना आणखी एक संधी मिळेल पण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ देखील खूप मजबूत आहेत.” वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराने सांगितले की, अधिक अनुभवी संघ असल्याने CSK ला स्पर्धेत थोडा फायदा होऊ शकतो. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात सीएसकेला दोनदा लीग स्टेजमध्ये पराभूत केले आहे, परंतु प्लेऑफमध्ये धोनीच्या संघाविरुद्ध दिल्ली फ्रँचायझीचा एक उत्कृष्ट रेकॉर्ड नाही आहे. प्लेऑफमध्ये चेन्नईने दिल्ली संघाला दोनदा पराभूत केले आहे. लारा म्हणाला, “हा एक चुरशीचा सामना असणार आहे आणि काय होणार आहे हे सांगणे फार कठीण आहे. चेन्नईने आपले शेवटचे तीन सामने गमावले आहेत, तर दिल्लीनेही शेवटचा सामना गमावला आहे.”

लारा म्हणाले की, “दिल्लीचे गोलंदाजी चेन्नई फलंदाजांचा चांगलाच समाचार घेणार आहे आणि ते त्यांना खूप त्रास देऊ शकतात. आयपीएलमध्ये दिल्लीकडे सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे परंतु सीएसकेकडे लांब फलंदाजी आहे. आता कोण जिंकणार हे मी ठरवू शकत नाही. प्रतिभेच्या बाबतीत दिल्लीकडे काही आश्चर्यकारक युवा खेळाडू आहेत पण चेन्नईकडे अनुभव आहे.”