IPL 2021, DC vs CSK Qualifier 1: पहिला क्वालिफायर खेळताच रिषभ पंत-MS Dhoni यांच्या नावे होणार मोठ्या विक्रमाची नोंद, IPL मध्ये घडणार इतिहास
रिषभ पंत आणि एमएस धोनी (Photo Credit: Twitter)

IPL 2021, DC vs CSK Qualifier 1: दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज रिषभ पंतचे (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. विजयी संघ थेट फायनलमध्ये पोहोचेलं तर ठरणाऱ्या संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक संधी मिळाले. या पहिल्या क्वालिफायर सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच पंत आणि तीन वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन कर्णधार धोनीच्या नावे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाची नोंद होईल. एमएस धोनी (MS Dhoni) 2008 मध्ये आयपीएलच्या सुरुवातीपासून चेन्नईचे नेतृत्व करत आहे तर पंतला श्रेयस अय्यरच्या जागी यंदा एप्रिल महिन्यात दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र युएई टप्प्यात अय्यरच्या कमबॅकनंतरही पंतला कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले होते. (IPL 2021, DC vs CSK Qualifier 1: एमएस धोनीवर भारी पडणार रिषभ पंतचे दिल्ली बॉईज, ‘या’ ताकदीमुळे फायनलमध्ये मिळणार एंट्री)

दुबई येथे चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पहिला क्वालिफायर सामना खेळत पंत प्लेऑफमध्ये कोणत्याही संघाचे नेतृत्व करणारा सर्वात युवा खेळाडू बनेल. रिषभ पंतचे वय सध्या 24 वर्ष आणि 6 दिवस असून तो या बाबतीत आपल्याच संघातील श्रेयस अय्यरला मागे टाकणार आहे. 2019 मध्ये श्रेयसच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी श्रेयसचे वय 26 वर्ष होते. पंत कोणत्याही आयपीएल संघाचे नेतृत्व करणारा पाचवा युवा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने 22 व्या वर्षी 4 महिने आणि 6 दिवस असताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. तसेच दुसरीकडे त्याचा विरोधी कर्णहार 40 वर्षीय एमएस धोनी प्लेऑफमध्ये संघाचे नेतृत्व करणारा दुसरा सर्वात वयस्कर कर्णधार बनेल. तथापही पहिल्या स्थानी राहुल द्रविड आहे. राहुल द्रविडने 2013 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी द्रविडचे वय 40 वर्षे, 114 दिवस होते.

दरम्यान, दुबई येथे नाणेफेक जिंकणारा संघ पहिले गोलंदाजी करू शकतो कारण धावांचा पाठलाग करणे या ठिकाणी दव घटकामुळे पसंतीचा पर्याय आहे. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी याच कारणामुळे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 10 साखळी सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आहेत.